हवन आणि यज्ञामध्ये काय फरक आहे
हवन हे याज्ञाचेच छोटे स्वरूप आहे. कोणतीही पूजा अथवा जप यांच्या नंतर अग्नीमध्ये देण्यात येणारि आहुतीची प्रक्रिया हवन या स्वरुपात प्रचलित आहे. यज्ञ म्हणजे एखाद्या खास उद्दिष्टाने विशिष्ट देवतेला देण्यात येणारी आहुती आहे. यामध्ये देवता, आहुती, वेद, मंत्र, ऋत्विक, दक्षिणा हे सर्व अनिवार्य असतात. हवन म्हणजे हिंदू धर्मामध्ये शुद्धीकरणाचे एक कर्मकांड आहे. कुंडात अग्नीच्या माध्यमातून देवतांच्या निकट हव्य पोचवण्याच्या प्रक्रियेला हवन म्हणतात.
हवी, हवी अथवा हविष्य ते पदार्थ आहेत ज्यांची अग्नीमध्ये आहुती दिली जाते. हवन कुंडात अग्नी प्रज्वलित केल्यानंतर या पवित्र अग्नीत फळे, मध, तूप, काष्ठ (लाकूड) इत्यादी पदार्थांची आहुती प्रमुख असते. असे मानले जाते की जरआपल्या जवळपास एखादी वाईट शक्ती किंवा आत्मा यांचा वावर असेल तर ही हवनाची प्रक्रिया आपल्याला त्यापासून मुक्ती मिळवून देते. शुभकामना, स्वास्थ्य आणि समृद्धी इत्यादीसाठी देखील हवन करण्यात येते.