Get it on Google Play
Download on the App Store

यज्ञाशी निगडीत विज्ञान


हे एक महत्त्वपूर्ण शास्त्र आहे. यामध्ये ज्या वृक्षांच्या समिधा उपयोगात आणल्या जातात, त्यांच्यात विशिष्ट प्रकारचे गुण असतात. कोणत्या प्रयोगासाठी कोणत्या प्रकारची सामग्री टाकण्यात येते त्याचे देखील विज्ञान आहे. त्या वस्तूंच्या मिश्रणातून एक विशेष गुण तयार होतो, जो जळल्यानंतर वायुमंडळात विशिष्ट प्रभाव निर्माण करतो. वेद मंत्रांच्या उच्चारणाच्या शक्तीने त्या प्रभावात अधिक वृद्धी होते. ज्या व्यक्ती त्या यज्ञात सामील होतात, त्यांच्यावर आणि निकटच्या वायुमंडळावर त्याचा मोठा प्रभाव पडतो. वैज्ञानिक अजूनपर्यंत कृत्रिम पाऊस पाडण्यात यशस्वी झालेले नाहीत, परंतु यज्ञाच्या द्वारे पावसाचे प्रयोग बहुदा सफल होतात. व्यापक सुख समृद्द्धी, पाऊस, आरोग्य, शांती यांच्यासाठी मोठ्या यज्ञांची आवश्यकता असते, परंतु छोटे होम-हवन देखील आपल्याला लाभान्वित करतात.