Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ६

१०१

भरल्या बाजारात चाटी राहीना उधाराला

जांमीन देते बंधुजी गुजराला

१०२

चाट्याच्या दुकानी बंधु बैसले दिगंबर

घेती उंच मोलाचे परकर

१०३

फाटलं लुगड चिंता पडली जोडियाला

चाटी बोलावू वाडियाला

१०४.

माह्यार काय केल ? मला पुसती सारी आळी

बंधुजीन चाटी लुटला सायंकाळी

१०५

चाट्याच्या दुकानी जळं समई उथाळ

बंधु साडी घेऊ का पाताळ ?

१०६.

लुगड घेतल दुही पदर जराचं

चाटी मितर दिराचं.

१०७.

चाटयाला चाटी बोले इकरा झाला न्हाई

बहिनीचा भाऊ बाजारी आला न्हाई.

१०८.

चाटयाच्या दुकानी , चंद्रकळा डोळ मोडी

मन रुतलं घाला घडी

१०९

लुगड घेतल हिरव गोमेकांठी

म्होर बंधुजी , मागे चाटी.

११०.

चिकनी सुपारी,वाण्याची रंभा झोकी

रतीव जेठ्या लेकी

१११.

चिकनी सुपारी,माझ्या बंधुला लागली

अशी वानीन चांगली,वारा घालाया लागली.

११२.

गडीन मी केली , लव्हाराची ताई

तिची लोखंडाची कडी माझ्या पाळ्न्यावर जाई.

११३.

साळंच्या पंतुजीला, देऊ केली डाळवाटी

लिहीन बाळाला येन्यासाठी

११४.

साळंच्या पन्तुजीला , देते मी जांबवाटी

माझ्या राघुबाला , नका मारुं छडीकाठी.

११५.

साळंच्या पंतुजीला,देऊ केलीया वाटीलोटी

भाचा पंडीत राघु लिहितो जगजेठी

११६.

साळंच्या पंतुजीला देऊं केलया निरस दूध

राघू पंडिताच लिहिन बाळबोध.

११७.

साळंच्या पंतुजीला, देऊ केलया दुधपेढं

कागद वाचीतो बापापुढं.

११८.

साळंच्या पंतुजीला, देऊं केली शालजोडी

बाळ शिकतया बारखडी.

११९.

कलालीनबाई तुझ्या दारी लाल जोडा

धनी कैफात झाला येडा.

१२०.

काललिनबाई नको करु कलकला

माझा कंथ दारु प्याला , उतारा सांग मला

१२१.

कललिनबाई ,जळू जळु दारुखाना

धरनी लोळतो मोतीदाना.