Get it on Google Play
Download on the App Store

चपळ ठाण विराजतसे बरें

चपळ ठाण विराजतसे बरें । परम सुंदर रूप साजिरें ।
धगधगीत बरी उटि सिंदुरे । निकट दास कपी विरहें खरें ॥१॥
कपी वीर जेठी उडे चारि कोटि । गिरी द्रोण दाटी तळातें उपाटी ।
झपेटी लपेटी करी पुच्छवेटी । त्रिकूटाचळीं उठवा वीर कोटी ॥२॥
रघुविरा समिरात्मज भेटला । हरिजनां भजनांकुर फूटला ।
कपिकुळें सकळें मिनलीं बळें । रिपुदळें विकळें वडवानळें ॥३॥
कपीवीर तो लीन तल्लीन झाला । प्रसंगेचि पाहोनि सन्मूख आला ।
हनूमंत हें पावला नाम तेथें । महीमंडळीं चालिलें सर्व तेथें ॥४॥
नव्हें सौख्य हा भीम पूर्णप्रतापी । देहो आचळातुल्य हा काळरूपी ।
पुढें देखतां दैत्यकूळें दरारा । भुतें कांपती नाम घेतां थरारां ॥५॥
सिमा सांडिली भीमराजें विशाळें । बळें रेटिलें दैत्य कृत्तांत काळें ।
गजामस्तकीं केसरीचा चपेटा । महावीर तैसा विभांडी त्रिकूटा ॥६॥

॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥९॥