Android app on Google Play

 

लग्न कारक योग

 


राहू द्वारा निर्मित शुभ योगांमध्ये लग्न कारक योगाचे नाव देखील प्रमुख आहे. लग्न कारक योग मेष, ऋषभ आणि कर्क लग्न असलेल्यांच्या पत्रिकेत तेव्हा येतो जेव्हा राहू द्वितीय, नवम अथवा दशम स्थानी नसतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत लग्न कारक योग उपस्थित असतो त्या व्यक्तीला राहूच्या अशुभ फळांचा सामना करावा लागत नाही. राहू अशा व्यक्तींसाठी शुभकारक असतो ज्यामुळे अपघात होण्याची संभावना कमी राहते. आरोग्य उत्तम राहते. आर्थिक स्थिती उत्तम राहते आणि सुखी संपन्न आयुष्य व्यतीत करतात.