राम्री द्वीप
हे बेट बर्माच्या जवळ स्थित आहे. या बेटाला गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अशासाठी स्थान मिळाले आहे की इथे भयानक जनावरांनी लोकांना सर्वांत जास्त हानी पोहोचवली आहे. या बेटावर खऱ्या पाण्याची अनेक सरोवरे आहेत आणि ती भयानक मगरींनी (Crocodiles) भरलेली आहेत.
द्वितीय विश्व महायुद्धाच्या दरम्याने जपानी सैन्याचे १००० सैनिक ब्रिटीश सैन्यापासून बचाव व्हावा यासाठी या बेटावर लपण्यासाठी पोचले, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक सर्व इथे असलेल्या भयानक मगरींची शिकार बनले. असे म्हणतात की या बेटावरून केवळ २० सैनिक जिवंत परत आले होते.