Get it on Google Play
Download on the App Store

डॉल आयलंड


मेक्सिको सिटी पासून १७ मैल दक्षिणेला Xochimilco canals मध्ये एक छोटेसे बेट आहे ज्याचे नाव “La Isla de la Munecas” आहे आणि आता ते डॉल आयलंड (The island of dolls) या नावाने ओळखले जाते. प्रत्यक्षात हे आयलंड एक तरंगणारा बगीचा (फ्लोटिंग गार्डन) आहे ज्याला मेक्सिको मध्ये चिनमपा (Chinampa) म्हणतात. या बेटाचे वैशिष्ट्य असे आहे की बेटावर शेकडोंच्या संख्येने भीतीदायक आणि तुटक्या फुटक्या बाहुल्या लटकलेल्या आहेत. हे बेट १९९० मध्ये प्रथम लोकांच्या नजरेला तेव्हा आले जेव्हा मेक्सिको सरकारने Xochimilco canals च्या सफाईचे काम सुरु केले आणि सफाई करताना काही कर्मचारी या बेटावर पोचले. या बेटाचे मालक जॉन जुलियन होते. ते या बेटाच्या बाबतीत माहिती करून घेण्यासाठी आपल्या परिवाराला सोडून इथे आले आणि जवळ जवळ ५० वर्षे इथेच राहिले.