Get it on Google Play
Download on the App Store

शिंपल्यांचे बेट


फडिऊथ आयलंड जे पश्चिम आफ्रिकेत सेनेगल कोस्ट जवळ आहे, त्याला लोक प्रेमाने शेल आयलंड (शिंपल्यांचे बेट) देखील म्हणतात. कारण या बेटावर करोडोंच्या संख्येने शिंपले एकत्र झालेले आहेत आणि आता अवस्था अशी आहे की तुम्ही जिकडे कुठे नजर फिरवल तिकडे शिंपलेच शिंपले दिसून येतात. इथले रस्ते शिंपल्यांचे बनलेले आहेत, घरांच्या भिंतीना शिंपले लावलेले आहेत, एवढेच नाही तर काबाती सुद्धा शिंपल्यांच्या बनलेल्या आहेत. प्रत्यक्षात शेल आयलंड हे अधिकृत रूपाने दुसऱ्या एका बेटाचे नाव आहे जिथे शिंपल्यांच्या सर्वांत अधिक प्रजाती आढळतात.