Android app on Google Play

 

मीन

 


दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची
राशी स्वरूप - मासा, राशी स्वामी - गुरु.
१. मीन राशीचे चिन्ह आहे मासा. या राशीचे लोक मैत्रीपूर्ण व्यवहाराने आपले कार्यालय, शेजार-पाजार इथे चांगल्या प्रकारे ओलाह्ले जातात.
२. हे कधीही अति मैत्रीपूर्ण व्यवहार करत नाहीत. यांचा व्यवहार अतिशय नियंत्रित असतो. कोणाचेही विचार हे सहजपणे ओळखू शकतात.
३ आपल्या बाजूने उदार आणि संवेदनशील असतात आणि व्यर्थ दिखावा आणि लबाडी यांना अजिबात आवडत नाही.
४. यांनी एकदा कोणावर विश्वास ठेवला की तो कायमसाठी ठेवतात, म्हनुंच हे आपल्या मित्रांशी चांगला भावनापूर्ण संबंध निर्माण करतात.
५. सौंदर्य आणि रोमांस यांच्या विश्वात हे वावरतात. कल्पनाशीलता अतिशय प्रखर असते. बहुतेक व्यक्ती लेखन आणि वाचन यांचे शौकीन असतात. निळा, पंधरा आणि लाल रंग अधिक आवडतो.
६. यांची उच्च अभिरुची आणि तिचा राभाव यांच्या घरात पाहायला मिळतो. यांचे घर यांच्यासाठी आयुष्यात अतिशय महत्त्वाच्या स्थानी असते.
७. आपले धन अतिशय सांभाळून खर्च करतात. पक्के मित्र मुश्किलीने एक किंवा दोन असतात. त्यांच्याशी हे आपल्या मनातील गोष्टी बोलू शकतात. हे लोक विश्वासघात सोडून काहीही सहन करू शकतात.
८. या राशीचे पुरुष भावनाप्रधान हृदय आणि पाणीदार डोळ्यांचे असतात. आपला विचार मांडण्यापूर्वी दोन वेळा विचार करतात. आयुष्याकडे लवचिक दृष्टीकोनातून पाहतात.
९. आपल्या कार्यक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. यांना बुद्धिमान आणि हसतमुख लोक जास्त आवडतात.
१०. हे लोक अतिशय संकोचानेच एखाद्याला आपल्या मनातील गोष्ट सांगू शकतात.. हे एक कोमल आणि भावूक स्वभावाची वव्यक्ती असतात. आपली पत्नी गृहिणी असणेच यांना जास्त आवडते.
११. हे स्वतः घरगुती कामा ढवळाढवळ करत नाहीत, आणि त्यांच्या व्यावसायिक कार्यात कुणाचा हस्तक्षेप सहन करत नाहीत. यांचे वैवाहिक जीवन अन्य राशीच्या लोकांच्या तुलनेत अधिक सुखकारक असते.
१२. मीन राशीच्या स्त्रिया भावून आणि चमकदार डोळ्यांच्या असतात. या सहजपणे कोणाशीही मैत्री करत नाहीत, पण एकदा का कोणावर विश्वास बसला, की मात्र मनातील सर्वकाही त्यांच्याजवळ सांगायला मागेपुढे पाहत नाहीत.
१३. या स्वभावाने कलेच्या प्रेमी असतात. बुद्धिमान आणि सभ्य व्यक्ती यांना आकर्षित करतात. या शांततेने त्यांचे बोलणे ऐकू शकतात आणि आपल्या भावना सहजपणे व्यक्त करू शकत नाहीत.
१४. आपली मैत्री आणि वैवाहिक जीवनात सुरक्षितता आवडते. आपल्या पाटीवर पूर्ण विश्वास असतो आणि तीच अपेक्षा त्यांची पतीकडून असते.
१५. यांना ज्योतिष वगैरेमध्ये आवड असू शकते. नवनवीन गोष्टी शिकण्याचा शौक असतो.