Get it on Google Play
Download on the App Store

तूळ


रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
राशी स्वरूप- तराजू,  राशी स्वामी- शुक्र.
१. राशीचे चिन्ह तराजू आहे आणि ही रास पश्चिम दिशेचे द्योतक आहे. ही वायुतत्वाची राशी आहे. राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांना कफाची समस्या अधिक असते.
२. या राशीचे पुरुष सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. डोळ्यात तेज आणि चेहेरा प्रसन्न असतो. यांचा स्वभाव सम असतो.
३. कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाहीत, दुसऱ्यांना प्रोत्साहन देणे, आधार देणे हा यांचा स्वभाव. या व्यक्ती कलाकार, सौंदर्याचे उपासक आणि स्नेहिल असतात.
४. हे लोक व्यवहारी असतात आणि त्यांच्या मित्रांना ते प्रिय असतात.
५. तूळ राशीच्या स्त्रिया देखिल मोहक आणि आकर्षक असतात. खुशमिजाज स्वभाव आणि हस्त खळखळून असते. बुद्धीवाली कामे काक्र्ण्यात अधिक रुची असते.
६. घराचा टापटीपपणा आणि स्वतः सुंदर दिसणे यांचा शौक असतो. कला, गाय आणि गृह कार्यात दक्ष असतात. मुलांशी खूप जवळीक असते.
७. या राशीची मुले साधे, संस्कारी आणि आज्ञाधारक असतात. घरात राहणे अधिक पसंत करतात. खेळ आणि कला क्षेत्रात यांना रुची असते.
८. तूळ राशीचे लोक बारीक, उंच आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. जीवनात आदर्शवाद आणि व्यावहारिकता यांच्यात आवश्यक संतुलन राखतात.
९. यांचा आवाज विशेषकरून सौम्य असतो. चेहेरा नेहमी हसरा असतो.
१०. यांना ऐतिहासिक स्थळांना भेट देणे आवडते. ते एक चांगले साथीदार असतात, मग ते वैवाहिक जीवन असो किंवा व्यावसायिक जीवांन असो.
११. आपल्या व्यवहारात न्यायवादी आणि उदार असतात. कला आणि साहित्याशी नाळ जोडलेली असते. गीत, संगीत आणि यात्रा यांचा शौक असलेल्या व्यक्ती यांना आवडतात.
१२. मुली आत्मविश्वासाने पूर्ण असतात. यांचे आवडता रंग गडद निळा आणि पंधरा आहेत. यांना वैवाहिक जीवनात स्थैर्य आवडते.
१३. वाद विवाद करण्यात फार वेळ घालवत नाहीत. सामाजिक पार्ट्या, उत्सव यांच्यात हिरीरीने भाग घेतात.
१४. यांची मुले शिक्षण किंवा नोकरी यांच्यामुळे लवकर यांच्यापासून दूर जाऊ शकतात.
१५. या स्त्रिया एक कुशल माता असतात ज्या आपल्या मुलांना उचित शिक्षण आणि आत्मविश्वास प्रदान करतात.