Android app on Google Play

 

सिंह

 


मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
राशी स्वरूप - सिंह, राशी स्वामी- सूर्य.
१. सिंह राशी पूर्व दिशेचे द्योतक आहे. तिचे चिन्ह सिंह आहे. राशीचा स्वामी सूर्य आहे आणि तत्व अग्नी आहे.
२. हिच्या अंतर्गत माघा नक्षत्राचे चारही चरण, पूर्वा फाल्गुनीचे चारही चरण आणि उत्तराफाल्गुनीचे पहिले चरण येते.
३. केतू-मंगल यांच्यात मनस्वी आवेश निर्माण करतात. केतू-शुक्र सजावट आणि सौंदर्याकडे आकर्षण निर्माण करतात.
४. केतू-बुध कल्पना करण्यासाठी आणि हवेत महाल बांधण्याचे विचार निर्माण करतात. चंद्र-केतू कल्पना शक्तीचा बिकास करतात. शुक्र-सूर्य स्वाभाविक प्रवृत्तींकडे ओढा निर्माण करतात.
५. या लोकांना सौंदर्याचा मोह असतो आणि तरे कामुकतेच्या मागे धावतात. या लोकांच्यात स्वतःबद्दल स्वातंत्र्याची भावना असते आणि हे कोणाचेही ऐकत नाहीत.
६. हे लोक पित्त आणि वायू विकाराने त्रस्त राहतात. रसाळ वस्तू यांना आवडतात. कमी जेवणे आणि भरपूर फिरणे या यांच्या सवयी असतात.
७. छाती मोठी असल्यामुळे यांच्यात खूप हिम्मत असते आणि संधी आल्यावर हे लोक जीवाशी खेळण्यासही मागे पुढे पाहत नाहीत.
८. हे लोक जीवनाच्या पहिल्या टप्प्यात सुखी, दुसऱ्या टप्प्यात दुःखी आणि तिसऱ्या टप्प्यात पूर्ण सुखी असत्तात.
९. सिंह राशीचे लोक प्रत्येक कार्य शाही ढंगाने करतात. विचार शाही, कृती शाही, जेवण शाही आणि राहणीमान शाही.
१०. या राशीचे लोक दिलेल्या शब्दाचे पक्के असतात. जे हवं तेच खाणार, अन्यथा उपाशी राहणार, यांना आदेश देणे माहिती, कोणाचा आदेश मात्र सहन होत नाही, कोणावर प्रेम केलं तर ते शेवटच्या श्वासापर्यंत निभावेल, जीवनाच्या जोडीदाराला पूर्णपणे समर्पित करतील, आपपल्या खाजगी जीवनात कोणीही आलेले या राशीच्या लोकांना कदापि आवडत नाही.
११. हे लोक कठोर मेहनत करणारे, धनाच्या बाबतीत अतिशय भाग्यवान असतात. सुवर्ण, पितळ आणि हिरे, जवाहिरे यांचा व्यवसाय या लोकांना खूप फायदा मिळवून देणारा असतो.
१२. सरकार आणि नगर पालीकावले यांना फार आवडतात. या लोकांची वाणी आणि चालचालन यात शालीनता असते.
१३. हे लोक सुदृढ शरीराचे मालक असतात. नृत्य करणे देखील या लोकांचे एक वैशिष्ट्य आहे. बहुतेक करून या राशीचे लोक एक तर पूर्ण आरोग्यसंपन्न राहतात किंवा आजीवन आजारी तरी राहतात.
१४. ज्या वातावरणात यांनी राहायला हवे, ते त्यांना मिळाले नाही, त्यांच्या अभिमानाला कोणी धक्का लावला किंवा यांच्या प्रेमात कोणती बाधा आली तर हे लोक आजारी राहू लागतात.
१५. मणक्याचे आजार किंवा जखमा यांनी आपले जीवन हे धोक्यात घालतात. या राशीच्या लोकांसाठी हृदयरोग, जलद गतीने ठोके पडणे, त्वचा रोग इत्यादी आजार होण्याची शक्यता असते.