परफेक्शन
परफेक्शन च्या मागे लागू नका. आपले ध्येय घेऊन परफेक्ट होण्याची इच्छा मनात बाळगू नका. परफेक्शन कुठेच नसते. असे म्हणतात की मनुष्य हा चुकांचा पुतळा आहे. म्हणूनच माणूस असल्यामुळे आपण दोषपूर्ण असतो. जर तुम्ही मनात परफेक्ट होण्याची इच्छा धरलीत तर अपयशाचा एक छोटा धागा सुद्धा तुम्हाला हताश करण्यासाठी पुरेसा असेल. त्यामुळे तुम्ही हाच विचार करत बसाल की आपण अयशस्वी कसे झालो आणि आपल्या काय चुका झाल्या. जर तुम्ही परफेक्शन च्या मागे लागला नाहीत तर छोटेमोठे अपयश तुम्हाला निराश करणांर नाही आणि आपल्या छोट्या छोट्या याशांनी प्रोत्साहित होऊन तुम्ही भविष्यात आणखी चांगले कार्य कराल.