Android app on Google Play

 

नकारात्मकता नकोच

 

स्वतःशी नकारात्मक गोष्टी बोलणे बंद करा. जेव्हा तुम्ही तुमच्या कारकिर्दीला नवीन दिशा देत असाल तेव्हा तुम्हाला प्रोत्साहन देणारे कदाचित कोणीही नसेल. अशात स्वतःबद्दल अनेक शंका यायला लागतात. तुमच्या नकारात्मक विचारांना तुमाच्यातूनच ताकद मिळते. तुम्ही त्यांच्यावर जेवढे जास्त फोकस करत तेवढेच ते प्रबळ होत जातील. तुमचे बहुतेक नकारात्मक विचार हे फक्त विचार आहेत, ते वस्तुस्थिती नाहीत. जेव्हा तुमचा तुमचे नकारात्मक विचार आणि निराशाजनक गोष्टींवर विश्वास बसू लागेल तेव्हा एक काम करा - तुम्ही ते विचार कुठेतरी लिहून ठेवा. तुम्ही जे काही करत असाल ते तिथेच थांबवा आणि विचार लिहून ठेवा. अशा प्रकारे तुमच्या निराशाजनक विचारांच्या वेगळा लगाम बसेल आणि तुम्ही गोष्टींना त्यांच्या प्रत्यक्ष रुपात जास्त तार्किक होऊन पाहू शकाल आणि वस्तुस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल.