व्यायाम आणि झोप
आपला व्यायाम आणि झोप यांकडे लक्ष द्या .चांगल्या झोपेचे महत्त्व यावर मी यापेक्षा काही बोलू शकत नाही. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचा मेंदू न्यूरॉन्स मधु ती हानिकारक तत्व काढतो जी जागृत अवस्थेत उपस्थित असतात. समस्या केवळ हीच आहे की मेंदू ही तत्व तेव्हाच काढू शकतो जेव्हा तुम्ही झोपता. जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर ही हानिकारक तत्व तुमच्या मेंदूत उपस्थित राहतील आणि तुमचे कार्य शिथिल करतील. या नुकसानाची भरपाई तुम्ही जागरणासाठी चहा कॉफी पिऊन देखील करू शकत नाही म्हणूनच भरपूर काम केल्यानंतर आपले शरीर आणि मेंदू यांना पूर्ण आराम द्या.
तुमचे आत्म-नियंत्रण, ध्यान आणि मेमरी आवश्यक झोप मिळाली नाही तर आणि शांत झोप मिळाली नाही तर कमी होते. झोप अपूर्ण झाली आणि कोणताही तणाव जाणवला नाही तरी देखील अनेक प्रकारची स्ट्रेस हार्मोन्स निघतात जे तुमची प्रोडक्टिविटी कमी करतात. कधी कधी असेही होऊ शकते की तुम्ही कामाच्या जोशात आपली झोप टाळू लागता, परंतु तसे करणे तुमच्या हिताचे नहीये.
Eastern Ontario Research Institute मध्ये झालेल्या एका संशोधनात असे लक्षात आले आहे की १० आठवड्या पर्यंत दिवशी दोन वेळा व्यायाम करणाऱ्या व्यक्ती अधिक सोशल, एकेडमिक आणि एथलेटिक असतात. ते आपल्या बॉडी इमेज च्या बाबतीत जागरूक असतात आणि त्यांच्या आत्मविश्वासाचा स्तर सुद्धा जास्त असतो. सर्वांत चांगली गोष्ट ही आहे की व्यायाम केल्यामुळे त्यांच्या शरीरात वाढणारे लाभदायक हार्मोन्स शरीराला तत्काळ सकारात्मक उर्जेने भरून टाकतात. तसेच शरीरात होणारे फिजिकल परिवर्तन देखील आत्मविश्वासाचा स्तर उंचावण्यात सहाय्यक असतात.
तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कामांना सांभाळून व्यायाम अशा प्रकारे योजा की तो चुकू नये नाहीतर तुमचा संपूर्ण दिवस वाया जाईल.