Android app on Google Play

 

तुमचे संबंध

 

तुम्ही तेवढेच चांगले बनू शकता ज्यांच्यासोबत तुम्ही जोडलेले आहात. तुम्ही त्या व्यक्तींशी संबंध ठेवले पाहिजेत जे तुम्हाला प्रेरणा देतील, आणि ज्यांना मनापासून तुमची प्रगती झालेली हवी असेल. कदाचित तुम्ही देखील असेच करत असाल. परंतु त्या लोकांबद्दल काय जे तुम्हाला सतत मागे ढकलतात? अशा लोकांना तुम्ही आपल्या आयुष्याचा भाग का बनवले आहे? तुमच्यातील कामतरतांची, बेचैनीची आणि नाउमेद करणारी जाणीव करून देणारे लोक तुमचा किती वेळ व्यर्थ दवडत आहेत आणि कदाचित तुम्हालाही ते आपल्या सारखेच बनवत आहेत. आयुष्य एवढे मोठे नाहीये की तुम्ही अशा लोकांचे लोढणे बाळगत बसावे. त्यांच्याशी आपले नाते संपवून टाका.