Android app on Google Play

 

सात मजली इमारत

 

ओक यांच्या मते ताजमहाल एक सात मजली इमारत आहे ज्याचा एक मजला तळमजल्याच्या स्वरुपात आहे. खालच्या मजल्यावर २२ दलाने आहेत जी कुलुपबंद ठेवलेली आहेत आणि कुणीही ती उघडून पाहिलेली नाहीत. या २२ दालनांच्या भिंतींवर हिंदू चित्र रेखाटलेली आहेत. सन १९३४ मध्ये या चिणलेल्या दालनांत एक भेग पाहून दिल्लीच्या एका रहिवाश्याने आत डोकावून पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. तिथे त्याला शंकराची तसबीर आणि अनेक अन्य हिंदू मुर्त्या देखील ठेवलेल्या दिसल्या. जर हा मकबरा शहाजहानने बनवला होता तर त्यातील कोणतीही गोष्ट लपवून ठेवण्याची काय गरज होती? प्रत्यक्षात या खोल्यांमध्ये तो लुटीचा खजिना देखील ठेवलेला आहे आणि जर तो उघडला गेला तर इतिहासातील अनेक गोष्टी खोट्या आहेत हे उघड होईल.