आग्र्याचा इतिहास
आग्रा प्रत्यक्षात अंगिरा ऋषींच्या नावावर वसलेले शहर आहे. प्राचीन काळी अग्र्यामध्ये ५ शिव मंदिरे बांधण्यात आली होती. परंतु आता तिथे केवळ ४ शिवमंदिरे - बलकेश्वर, पृथ्वीनाथ, मनकामेश्वर आणि राजराजेश्वर ही आहेत. पाचवे मंदिर म्हणजेच नागनागेश्वर हेच कबरीत परिवर्तीत करून ताजमहाल बनवले गेले. ओक यांच्या मते लखनौ\च्या वास्तू संग्रहालयात एक शिलालेख ठेवलेला आहे ज्यावर लिहिले आहे की "स्फटिका प्रमाणे शुभ्र इंदुमौलीश्वराचे (शंकराचे) मंदिर बांधले गेले. (ते एवढे सुंदर होते कि) त्यामध्ये निवास केल्यावर शंकराला कैलासात परतून जाण्याची इच्छाच राहिली नाही. ताजमहालाच्या घुमटामध्ये अनेक लोखंडाचे कप्पे आहेत जे दिवे ठेवण्यासाठी उपयोगात आणले जात होते. सरळ आहे, हे एका मंदिरातच होऊ शकते, कबरीत नाही.