सलील चौधरी
सलील चौधरी हे बंगाली, हिंदी आणि मल्याळम चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध संगीतकार होते. ते एक प्रथितयश कवी आणि नाटककार देखील होते. सलीलदा या नावाने प्रसिद्ध असलेले हे संगीतकार अनेक वाद्ये वाजवण्यात पारंगत होते. १९५३ मध्ये त्यांनी हिंदी चित्रपट 'दो बिघा जमीन' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल ठेवले. या चित्रपटाला देशात आणि विदेशातही प्रचंड लोकप्रियता प्राप्त झाली. त्यांचे संगीत म्हणजे पाश्चिमात्य आणि पौर्वात्य संगीताचा एक अनोखा सुरेल संगम होता. परंतु सलीलदा नेहमीच या वैचारिक मंथनात हैराण असायचे की कोणत्या कलेला जास्त महत्व दिले पाहिजे.