Android app on Google Play

 

सचिन देव बर्मन (एस डी बर्मन)

 


सचिन देव बर्मन यांचा जन्म १९०६ मध्ये झाला होता आणि त्यांनी सर्वांत आधी बंगाली चित्रपटांसाठी संगीत द्यायला सुरुवात केली. त्यानंतर लवकरच ते हिंदी चित्रपटांना संगीत देऊ लागले आणि अनेक यशस्वी चित्रपटांना त्यांनी आपल्या सदाबहार संगीताने सजवले. किंवा असे देखील म्हणता येईल की अनेक चित्रपट यशस्वी होण्यात त्यांच्या संगीताचा मोठा वाट होता. त्यांनी जवळपास १०० हूनही अधिक हिंदी चित्रपटांना संगीत दिले आणि या व्यतिरिक्त काही गाण्यांना आपला आवाज देखील दिला. परंतु त्यांची अशी अट होती की त्यांचा आवाज कोणत्याही अभिनेत्यासाठी वापरण्यात येणार नाही, आणि म्हणून ते केवळ अशीच गाणी गायचे जी बेकग्राउंड ला वाजत असत. सचिन देव बर्मन यांचे किशोर कुमार यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि ते किशोर कुमारला आपला दुसरा मुलगा मानत असत. अगदी रात्री अपरात्री देखील ते कधीही किशोर कुमारला फोन करून आपली धून ऐकवून गाणे गाण्याचा अनुग्रह करत असत.