Android app on Google Play

 

राहुल देव बर्मन (आर. डी. बर्मन / पंचमदा)

 


सुप्रसिद्ध लोकप्रिय संगीतकार सचिन देव बर्मन (एस डी बर्मन) यांचे सुपुत्र राहुल यांचा जन्म १९३९ मध्ये झाला होता. चित्रपट जगतात त्यांना पंचम दा या नावाने देखील ओळखण्यात येत होते. पंचम शब्दाचा अर्थ बंगाली मध्ये पाच असा आहे. असे म्हटले जाते राहुल देव पाच सुरांत रडत असत म्हणून त्यांचे नावव पंचम ठेवण्यात आले. त्यांचा पहिला यशस्वी चित्रपट होता 'तीसरी मंजिल' जो १९६६ मध्ये प्रदर्शित झाला. त्यांनी ३३१ गाणी संगीतबद्ध केली ज्यामध्ये २९२ गाणी ही हिंदी भाषेत होती आणि बाकीची बंगाली, तामिळ, तेलगु आणि ओरिया भाषेतील होती. तसे पाहिले तर आर डी बर्मन यांच्या संगीत शैलीने त्या काळातील चित्रपट उद्योगाच्या संगीत जगतात खूप परिवर्तन आले होते, परंतु तरी देखील त्यांना आपल्या कारकिर्दीत केवळ ३ फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आले, ज्यापैकी एक मरणोत्तर होता, त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेला चित्रपट १९४२ - अ लव्ह स्टोरी या चित्रपटासाठी.