नौशाद
संगीतकार नौशाद यांचा जन्म १९१९ मध्ये झाला होता आणि ते भारतीय चित्रपट जगतातील सुरुवातीच्या संगीतकारांपैकी एक होते. त्यांच्या संगीतात शास्त्रीय संगीताची वैशिष्ट्ये अत्यंत परिपूर्ण स्वरुपात पाहायला मिळतात. त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला यशस्वी चित्रपट होता 'रतन' जो १९४४ साली प्रदर्शित झाला होता. संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना १९८२ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने आणि १९९२ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नौशाद एक अत्यंत यशस्वी कवी देखील होते आणि त्यांच्या शायरी ची पुस्तके देखील चापून आलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त त्यांना फिल्मी दुनियेतील संगीतामध्ये वेगवेगळे प्रयोग यशस्वीरीत्या करून पाहण्यासाठी ओळखले जाते.