हात जोडून नमस्कार करणे
आपण जेव्हा कधी कोणाला भेटतो तेव्हा हात जोडून नमस्ते किंवा नमस्कार करतो. या परंपरेच्या मागील वैज्ञानिक तर्क असा आहे की असे हात जोडून नमस्कार करताना हाताच्या सर्व बोटांचे अग्र आपसात एकमेकांशी संपर्कात येतात आणि त्यांचा एकमेकांवर दबाव पडतो. हाताच्या बोटातील नसांचा संबंध शरीरातील सर्व प्रमुख अंगांशी असतो. त्यामुळे बोटांवर दबाव पडतो तेव्हा एक्युप्रेशर चा थेट प्रभाव आपले डोळे, कान आणि मेंदूवर पडतो. त्याच बरोबर नमस्कार केल्यामुळे समोरची व्यक्ती आपल्याला दीर्घ काळ लक्षात ठेवते आणि आपल्या लक्षात राहते. या संदर्भातील एक अन्य तर्क असा आहे की जेव्हा आपण हातात हात मिळवून अभिवादन करतो तेव्हा हातांच्या संपर्कातून समोरच्या व्यक्तीचे किटाणू आणि जंतू आपल्या पर्यंत पोहोचू शकतात. उलट नमस्कार केल्याने एकमेकांचा शारीरिक रूपाने संपर्क येत नाही आणि रोग पसरवणारे व्हायरस आपल्या पर्यंत पोचू शकत नाहीत.