जमिनीवर बसून भोजन करणे
जमिनीवर बसून भोजन करणे हे पचन व्यवस्था आणि पोटासाठी अतिशय फायदेकारक आहे. मांडी घालून बसने योग्य असं आहे. या अवस्थेत बसल्यामुळे मेंदू शांत राहतो आणि जेवत असताना जर मेंदू शांत असेल तर पचन क्रिया चांगली राहते. मांडी घालून बसून जेवताना मेंदूपासून एक संकेत पोटापर्यंत जातो की अन्न ग्रहण करण्यासाठी तयार व्हावे. या आसनात बसल्यामुळे गैस, बद्धकोष्ठ, अपचन यांच्यासारख्या समस्या दूर राहतात.