कान टोचण्याची परंपरा
स्त्री आणि पुरुष, दोघांसाठी देखील पूर्वीच्या काळापासूनच कान टोचण्याची परंपरा चालत आलेली आहे. अर्थात, सध्याच्या काळात पुरुष वर्गात ही परंपरा पाळणाऱ्या लोकांची संख्या बरीच कमी झाली आहे. या परंपरेच्या मागील वैज्ञानिक मान्यता अशी आहे की या क्रियेमुळे विचार करण्याची क्षमता वाढते, वाचा शुद्ध आणि चांगली होते. कानाच्या पाळीपासून मेंदूपर्यंत जाणाऱ्या नसेमधील रक्त प्रवाह नियंत्रित आणि व्यवस्थित राहतो. कान टोचण्यामुळे एक्यूपंक्चर पासून होणारे आरोग्यदायक फायदे देखील प्राप्त होतात. अशी मान्यता आहे की यामुळे लहान मुलांना नजर देखील लागत नाही.