मुकेपणा
द्वितीयेश जर गुरु सोबत आठव्या स्थानी स्थित असेल तर व्यक्ती मुकी होण्याची प्रबळ शक्यता असते.
बुध आणि सहाव्याचा स्वामी लग्नात असेल तरी देखील व्यक्ती मुकी होऊ शकते. कर्क, वृश्चिक किंवा मीन लग्नात बुध कुठेही आणि क्षीण चंद्राने त्याला पाहिले तर जातक हकला होऊ शकतो. म्हणजेच बोलताना अडखळण्याचा आजार त्याला होऊ शकतो.
कोणतेही लग्न असो परंतु शुक्र जर दुसर्या स्थानी क्रूर ग्रहाशी युती करत असेल तर व्यक्ती तिरळी किंवा नेत्र विकार युक्त किंवा तोतरी बोलणारी होऊ शकते.
द्वितीयेश आणि अष्टमेश यांची युती असेल किंवा द्वितीयेश पाप पिडीत असेल आणि त्यावर अष्टमेशची दृष्टी असेल तर तोतरेपणा किंवा मुकेपणाची पूर्ण शक्यता असते.