Get it on Google Play
Download on the App Store

चंद्र

चंद्रमा " माँ (आई) " चा सूचक आहे आणि मनं चा कारक आहे. शास्त्र सांगते की "चंद्रमा मनसो जात:". याची कर्क राशी आहे. कुंडलीत चंद्र अशुभ असता मातेला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा आरोग्याला धोका असतो, दूध देणाऱ्या पशूंचा मृत्यू होऊ शकतो. स्मरणशक्ती क्षीण होते. घरात पाण्याची टंचाई निर्माण होते किंवा विहिरी, नद्या इत्यादी कोरड्या पडतात. मानसिक तणाव, मन घाबरे होणे, नाही नाही त्या शंका मनात येतात, मनात अनिश्चित भीती आणि शंका घर करून राहतात आणि सर्दी राहते. व्यक्तीच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार वारंवार येत राहतात.

उपाय
सोमवारचे व्रत करणे, मातेची सेवा करणे, शंकराची आराधना करणे, मोती धारण करणे, दोन मोती किंवा चार चांदीचे तुकडे घेऊन एक तुकडा पाण्यात प्रवाहित करावा आणि एक स्वतःकडे ठेवावा. कुंडलीच्या सहाव्या स्थानात चंद्र असेल तर दुध किंवा पाण्याचे दान करणे वर्ज्य आहे. जर चंद्र बारावा असेल तर धर्मात्मा किंवा साधूला भोजन देऊ नये आणि दूध देखील पाजू नये. सोमवारी पंढरी वस्तू जसे दही, साखर, तांदूळ, पांढरे वस्त्र, जानवीजोड, दक्षिणेसह दान करावे आणि " ॐ सोम सोमाय नमः " या मंत्राचा १०८ वेळा नियमित जप करावा.