सूर्य
सूर्य पिता, आत्मा, समाजात मान, सन्मान, यश, कीर्ती, प्रसिद्धी, प्रतिष्ठा यांचा कारक असतो. याची राशी सिंह आहे. पत्रिकेत सूर्य अशुभ असेल तर पोट, डोळे, हृदयाचे आजार होऊ शकतात तसेच सरकारी कामात बाधा उत्पन्न होऊ शकते. याची लक्षणे ही आहेत की तोंडात वारंवार बेडका जमा होतो, सामाजिक नुकसान, अपयश, मन सतत दुःखी आणि असंतुष्ट असणे, पित्याशी वाद किंवा वैचारिक मतभेद, सूर्याच्या पीडेची लक्षणे आहेत.
उपाय : अशा अवस्थेत प्रभू श्रीरामाची आराधना करावी. आदित्य हृदय स्तोत्राचे पठाण करावे. सूर्याला अर्घ्य द्यावे. गायत्री मंत्राचा जप करावा. तांबे, गहू आणि गुळाचे दान करावे. प्रत्येक कार्याचा आरंभ गोड खून करावा. तांब्याचा एक तुकडा कापून त्याचे दोन भाग करावेत. एक पाण्यात प्रवाहित करावा आणि दुसरा आयुष्यभर सोबत ठेवावा. ॐ रं रवये नमः किंवा ॐ घृणी सूर्याय नमः मंत्राचा १०८ वेळा (१ माळ) नियमितपणे जप करावा.