Get it on Google Play
Download on the App Store

कर्करोग

कर्करोगाने मृत्यू योग आहे की नाही. कर्करोग आहे की नाही हे जाणून घेता येते. अनेक ज्योतिषीय योग असल्यावर आपल्याला सहज समजते परंतु सखोल ज्ञान होण्यासाठी ज्योतिष विद्येची आवश्यकता आहे. ज्योतिष गणित असणे आवश्यक आहे. आता या रोगाच्या बाबतीत काही माहिती घेऊयात 

राहूला विष मानले गेले आहे. जर राहूचा एखाद्या भाव किंवा भावेश शी संबंध असेल किंवा त्याचा लग्न किंवा रोग भावाशी संबंध असेल तर शरीरात विषाचे प्रमाण वाढते.

सहावे लग्न किंवा आठव्या किंवा दहाव्या स्थानात स्थित होऊन राहूची दृष्टी असेल तर कर्करोग होण्याची संभावना वाढते.

बाराव्या स्थानी शनी - मंगळ किंवा शनी - राहू किंवा शनी आणि केतू यांची युती असेल तर जातकाला कर्करोग होण्याची शक्यता वाढते. राहूची त्रिक भाव किंवा त्रिकेशावर दृष्टी असेल तरी कर्करोगाची शक्यता वाढते.

सहावे स्थान अर्थात रोग भाव तसेच षष्ठेश पिडीत किंवा क्रूर ग्रहाच्या नक्षत्रात असेल तरीही कर्करोग दिसून येतो. बुध ग्रह त्वचेचा कारक आहे. तेव्हा बुध जर क्रूर ग्रहणी पिडीत असेल तर किंवा राहूची दृष्टी असेल तर जातकाला कर्करोग होतो. 

बुध ग्रह पिडीत किंवा दुर्बल किंवा क्रूर ग्रह असणाऱ्या नक्षत्रात स्थित असेल तर कर्करोगाला जन्म देतो.

बृहत्पाराशरहोराशास्त्र नुसार सहाव्या स्थानी क्रूर ग्रहाचा प्रभाव आरोग्यासाठी हानिकारक असतो. अर्थात जातक रोगी असेल. आणि जर सहाव्या स्थानी राहू आणि शनी असतील तर तो असाध्य रोगाने ग्रासला जाऊ शकतो.