१४) अॅनिस्टन संकटात
जेफ ट्रेलला अॅनाकडून सगळी माहिती मिळाल्यावर त्याच दिवशी तो
रॉबर्ट गॉडमन च्या शोधार्थ निघाला होता....
त्याला
विविध ठिकाणी चौकशीअंती कळले की रॉबर्ट गॉडमन आता रिटायर्ड झाले असून ते लंडन मधील
एका उपनगरात राहातात.
प्रथम
त्यांनी जेफच्या भेटीस नकार दिला. मग सर्व गोष्टी थोडक्यात फोनवर समजावून
सांगितल्यानंतर ते अस्वस्थ झाले, त्यांची खात्री पटली आणि त्यांनी जेफला घरी
बोलावले.
जेफ आणि ते
घरासमोरच्या बागेत खुर्चीवर बसले होते.
जेफ विचारत
होता: "आपली मदत हवी आहे. अॅना आणि सर्वजण मध्य प्रदेशातल्या त्या
खेड्यातल्या जंगलात गेले आहेत."
गॉडमन गहन
विचारात होते. बराच वेळ ऐकून घेतल्यावर मौन तोडले आणि अचानक काहितरी आठवल्यासारखे
करून ते म्हणाले,
"जेफ, अॅनिस्टन च्या जीवाला धोका आहे हे नक्की. मी
तूला सगळे काही सांगतो, पण त्या आधी मला अॅनिस्टन ला कॉल करून तो जेथे
कुठे असेल तेथे त्याला सावध राहायला सांगायला हवे. आताच, ताबडतोब!"
असे म्हणून
ते उठून फोन करायला गेले पण फोन लागत नव्हता. अचानक त्यांना आठवले की अॅनिस्टन
विमानाने एका देशात संशोधनासाठी जाणार आहेत. म्हणून फोन लागत नाही आहे. ते सोबत
काही लाल, पिवळ्या
आणि निळ्या मातीचे नमुने घेवून् ते एका कॉन्फरन्स साठी निघाले होते. काही
दिवसांपूर्वीच याबाबत गॉडमनची अॅनिस्टनशी चर्चा झाली होती. गॉडमन ने त्यांना एक
सावध करणारे इमेल आणि एस्.एम. एस. करून ठेवला. जेव्हाही ते वाचतील तेव्हा सावध
होतील. आता हातात दुसरे काही नाही.
तसा
सुरूवातीला न्यूज बघून गॉडमन ला थोडा अंदाज आला होता की कदाचीत जलजीवा पुन्हा
जागृत झालेत की काय? पण लागोलाग
जेफ भेटल्यामुळे आणि त्याने सर्व वृत्तांत सांगितल्यामुळे ते आता त्यांना खात्री
झाली.
ते म्हणाले,
"चल जेफ. तुला सांगतो सगळं काही.
जर अॅनाला कॉल मध्ये घेता येत असेल तर घे, तेथे ते असतील त्यांना ऐकू दे हे सर्व."
जेफ आणि
गॉडमन मध्ये गेलेत. त्यांनी अॅनाला कॉल लावला.
प्रथम जेफ
बोलला,
"अॅना, मला गॉडमन भेटले आहेत. आपन एक ऑडॉओ कॉन्फरन्स
घेवू यात. त्यात ते आपल्याला सर्व सांगणार आहेत. तुम्ही सर्व काय करत आहात?"
अॅना
म्हणाली,
"थॅन्क्स जेफ. तुझे खुप धन्यवाद.
आम्ही जंगलातल्या त्या तळ्यातच आहोत. शोधाशोध सुरू आहे. रॉबर्ट गॉडमन च्या मदतीची
आनी मार्गदर्शनाची आता गरज आहे. अमेयला परत बोलावण्यासाठी आनी जलजीवांचा नायनाट
करण्यासाठी!"
जास्त वेळ
न दडवता गॉडमन नी सुरूवात केली,
"जेफ नी मला काय घडले याबद्दल
कल्पना दिली आहेच. अमेय हा त्यांचा या वेळचा प्रथम मानव्-जलजीवा असावा.
त्याला जर
पूर्वरूपात आणायचे असेल आणि जलजीवांच्या अधिपत्याखालून वाचवायचे असेल तर तो दिसताच
लाल माती त्याच्यावर टाकायला हवी.
पण, त्याला शोधायचे कसे हा प्रश्न आहे. कदाचीत ते
सर्व अॅनिस्टन ला मारण्यासाठी आकाशात जमले असावेत.
जसे दुसर्या
महायुद्धात जलजीवांनी इतर मानवांना जलजीवा बनवण्यास सुरूवात केली होती तसेच आता
सुद्धा केली आहे.
यावेळेस हे
काही प्रथम नाही आहे की त्यांनी मानवांना जलजीवा बनवले. दुसर्या महायुद्धाच्या
काळात जलजीवा बनवलेल्या मानवांकडून सागरी लुटालुटीचे काम त्यांनी करून घेतले होते.
मानव जलजीवा लाल मातीने पुन्हा मानव रूपात येतात. आता यावेळेस ते पुन्हा बर्याच
मानवांना जलजीवा बनतील.
दुसर्या
महायुद्धात अनिस्टनच्या प्रयोगाद्वारे त्यांनी त्या झाडाच्या पानांचा उपयोग करून
पाण्याच्या चौथ्या रुपात म्हणजे "गोठलेल्या पाण्याच्या पण गरम असणार्या
बर्फाच्या" रुपात त्या जलजीवांना गोठवून अनेक हेलीकॉप्टरद्वारे अंटार्टीका
खंडावर त्यांना मोठ्या टाक्यांमध्ये आणून अतिशय खोल खोदून त्यांना गाडून बंद करून
टाकले होते.
जेनिफर ही
एक हुशार जलजीवा.
तीने त्याच
वेळेस सर्व रहस्य जाणले होते.
म्हणजे अॅनिस्टन
बद्दल, तसेच
कोणत्या प्रकारच्या झाडांमुळे जलजीवांना पाण्याच्या चौथ्या रुपात बंद करून टाकता
येत होते, तसेच लाल
आणि हिरव्या मातीचा पभाव, त्या झाडांचा शोध लावणारा अमेयचा पूर्वज. पण हे
समजल्यानंतर तीने काही उत्पात घडवण्याच्या आतच त्यांना अंटार्टिका खंडावर बंद केले
होते.
तीचा एक
प्रियकर होता. रेमो रॅमसन.
त्यानेच
तीला आणि इतरांना हिरव्या मातीच्या मदतीने जीव धोक्यात घालून अंटार्टिका खंडातून
पुन्हा जिवंत केले असावे. त्यानेच स्वतःचा जीव धोक्यात घालून तीला ही सगळी माहिती
सांगितली होती.
पण, मला चांगले आठवते की नुकतेच त्याचा आणि इतर
मित्रांचा मृतदेह अंटार्टिका खंडावर आढळला होता. जेनिफरनेच त्यालाही मारले असावे.
या तिसर्या वेळेस ते पृथ्वीवर फक्त आणि फक्त विध्वंस करायलाच आले आहेत हे मी ठाम
पणे सांगू शकतो. पण, आधी ते
सगळी झाडे आणि त्या बीया आणि भुकटी जेथे जेथे असेत ते नष्ट करूनच मग जगासमोर
स्वतःला आणतील. पण ती सगळी ठीकाणं त्यांना सहजा सहजी सापडणार नाहीत..."
तिकडे अॅनिस्टन
प्रवास करत असलेले विमान ढगरूपात असलेल्या जलजीवांनी घेरले. ते ठीकाण होते मध्य
प्रदेशातल्या जंगलाच्या बरोबर वरच्या बाजूला पण, अमेय जेव्हा अॅनिस्टन ला मारायला धावला तेव्हा
त्यांचा जवळची प्रयोगासाठीची लाल माती त्याचेवर उडाली आणि तो पुन्हा मानव बनून
खाली पडला त्याच तळ्यात!!