Get it on Google Play
Download on the App Store

८) जॉर्जियन स्क्वेअर आयलॅण्ड

त्या मुख्य एक्सेल फाईलचा पासवर्ड तीच्या वडीलांच्या नावाचा होता पण फक्त स्पेलींगमध्ये थोडा फेरफार केलेला होता तो आईने तीला सांगितला होताच!

फक्त चकीत करणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे त्या फाईलमध्ये ज्या इतर सिडीजची, तारखेवार विविध प्रकारच्या फाईलसची जी लीस्ट होती, त्यांचे पासवर्ड समोरच्या कॉलममध्ये लिहिले होतेच पण प्रत्येक फाईलचा पासवर्ड डेव्हील्स स्क्वेअर या शब्दानेच बनलेला होता आणि फक्त त्यात विविध अंकांची योजना केली होती.

आणखी वरच्या बाजूला एक बारीक सूचना लिहीली होती, की हे जे लिहीलेले पासवर्ड्स होते त्यांच्या अंकात अजून काहितरी एक ठरावीक बदल करायचा आणि मगच तो पासवर्ड व्हॅलीडेट (प्रमाणीत) झाला असता.

आणि काय फेरफार करायचा हे पुन्हा एका फाईलमध्ये लिहिले होते आणि ती फाईल कशी ओपन करायची याबद्दलही काही सूचना होत्या.

"
सगळे काही विस्मयकारक आहे, आश्चर्यजनक आणि अविश्वसनीय आहे", अ‍ॅना विचार करत होती.

"
ठीक आहे, आणखी काही आहे की फक्त हेच आहे जे तुला सांगायचे होते?" अ‍ॅना आईला म्हणाली.

"
नाही लाडके, एवढीच एक फाईल दाखवायची होती", आईचा श्वास थोडा गुदमरल्यासारखा वाटत होता.

"
बंद कर ती फाईल आणि शट डाऊन कर..."

अ‍ॅना म्हणाली, "ओ.के. नंतर मी बघेन सगळं! आता मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे."

असे म्हणत तीने विन्डोज शट डाऊन केले.

पण जसा कॉम्प्युटर आणि विंडोज शट डाऊन केल्यावर पुन्हा स्टार्ट करता येतात तसे मानवी जन्म शट डाऊन केल्यावर नंतर पुन्हा स्टार्ट करता येत नाही, किमान आपल्या हाती तरी ते नसतं. मानवी आयुष्य शट डाऊन करणं आपल्या हातात नसतं. ते या पृथ्वीला चालवणारा कुणीतरी प्रोग्रामर असतो की आणखी कुणीतरी, त्याच्या हातात असते. मानवी जन्म शट डाऊन झाल्यावर पुडे काय होते? हे आजपर्यंत कुणालाही कळलं नाही. पण, नक्की काहीतरी होत असावं.

कारण, शरीर जरी नष्ट होत असलं तरी त्यात असलेल्या मेंदूंमधले विचार? त्यांचं अस्तित्त्व नेमकं शरिरात कसं, कुठे असतं (आपण मानतो की ते मेंदूत असतं), मृत्यू सोबत शरीराबरोबर ते विचारही नष्ट होतात? नाही! विचारांना वस्तुमान नसतं. विचार ही एक उर्जा असते का? आणि उर्जा नष्ट केली जाऊ शकत नाही, फक्त उर्जेचे रुपांतर होवू शकते. कशात होते रूपांतर या सगळ्या विचारांचे, विचारांना उर्जा मानले तर??

रोझी डिमेलो- हॉफमन चे आयुष्य शट डाऊन झाले होते. इकडे कॉम्प्युटर आणि तिकडे अ‍ॅनाच्या आईचे जीवन. अ‍ॅनाचे लक्ष मॉनिटरकडून उजवीकडे हातात सॅण्डविच असलेल्या आणि डोळ्यातून अश्रू गाळत असलेल्या जेफकडे गेले. आणि तीने गर्रकन मागे वळून बघितले.

आताच आपल्याशी बोलत असलेली आई अशी अचानक निघून गेली?

निदान डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे उद्यापर्यंत तरी तीचा सहवास लाभला असता. पण, ती तीच्या शेवटच्या इच्छा सांगू शकली हे महत्त्वाचे होतेच.

अमेय? कुठे आहेस तू?

आई आता या जगात नसल्याने तीला रडू कोसळले. जेफने तीला आधार दिला. मनातल्या तीव्र भावनेतून निर्माण झालेला तो अ‍ॅनाच्या डोळ्यातला अश्रू!!

अ‍ॅनाच्या नाजुक, सुंदर गालावरून ओघळत जाणारा तो तीव्र भावनेचा अश्रू!!
त्या अश्रू सारखेच असलेले दोन मोत्यासारखे भितीदायक डोळे त्या जंगलातल्या तळ्याजवळून घरी परतणार्‍या अशोकराव, जितिन आणि धोंडू यांचे कडे रोखून पाहात होते. त्या तिघांना त्याची अर्थातच कल्पना नव्हती. अमेयचा फक्त मोबाईल त्यांना सापड्ला. बाकी कॅमेरा आणि इतर वस्तू गायब होत्या. बॅग ही कुठे सापडत नव्हती.

जंगलात नामातुआंची अखंड किलकिल सुरूच होती. नेहेमी पेक्षा त्यांच्या ओरडण्याला आज एक विचित्र अशी मिती होती.अमेयचा शोध न लागल्यामुळे ते तिघे घाबरले होते, काळजी करत होते.

ते भर पावसात बाईकवर परत येत असतांना त्या जंगलातल्या मध्यभागी असलेल्या जार्वार पर्वतावर उभी असलेली अद्वीतीय सुंदर स्त्री पावसाच्या पाण्यात हसत हसत विरघळत होती. विरघळून ती पर्वताच्या टोकाशी जात होती. इतर पावसाचे पाणी पर्वतावरून खाली कोसळत होते, पण "ते" पाणी, पर्वताच्या पायथ्यापासून वरच्या दिशेने चढत होते. असे अनेक जलजीवा पाणी रुपात पर्वताच्या टोकाकडे उलट वाहात जात होते. दॄश्य मोठे अदभुत होते.

रस्त्यावरून परत येत असतांना एक वीज कडाडली आणि त्या विजेच्या प्रकाशात आकाशात अनेक मोत्यासारखे डोळे पापणी न लवता पॄथ्वीवर बघतांना दिसत होते.
पाऊस सुरु असतांना खिडकीतून कडाडल्या वीजेकडे सहज म्हणून बघतांना अ‍ॅनाला त्या वीजेच्या प्रकाशात आकाशात अनेक डोळे पापणी न लवता पॄथ्वीवर बघतांना दिसत होते. एव्हाना तीला अमोलला कॉल केल्यावर अमेयच्या गायब होण्याची बातमी समजली होती आणि तीच्या साठी हा दुसरा धक्का होता.

अरविंद आणि अमोल वगैरे सगळ्यांना बातमी समजलेली होती. सगळ्यांनी आपापल्या परीने तपास करायला सुरूवात केली होती.

अशोकरावांचे मित्र असलेले पोलीस सुद्धा सत्य परिस्थिती समजावीन घेवून तपस करण्याचे ठरवून, विविध प्रश्न विचारून निघून गेले होते.

दुसर्‍या दिवशी सकाळी टीव्ही टीम सुद्धा अशोकरावांकडे येवून पोहोचली होती. यापूर्वी जगातल्या विविध अशा अनोळखी आणि दुर्गम पर्वतात, जंगलात कधी एकट्याने तर कधी टिमसोबत कितीतरी वेळा अमेयने शूटींग केली होती,

पाण्याखाली सुद्धा त्याने बरेच व्हीडीओज शूट केले होते. पण स्वतःच्या काकांच्या गावी ओळखीच्या अशा ठीकाणी अमेय अचानक नाहीसा कसा झाला?

तशा व्यक्ती रहस्यमयपणे नाहीश्या होणाच्या अनेक घटना आतापर्यंत जगात विविध ठिकाणी घडल्या आहेत आणि त्या व्यक्तीचा नंतर कसलाच ठावठीकाणा, थांगपत्ता लागला नाही. पण, काही बाबतीत गायब होणारी व्यक्ती ही एक्तीच असायची. त्या व्यक्तीसोबत काय घडले हे त्यामुळे कुणालच कळत नव्हते.

अमेयचा कॅमेरा सुद्धा गायब होता. त्यामुळे काय झाले हे इतरांना कळायला काही मार्ग नव्हता. जंगलात हिस्र प्राणी नव्हते. फक्त रानमांजरासारखे दिसणारे काहीतरी त्या जंगलात राहात होते, पण त्यापासून तसा धोका नव्हता.

लेस्टर बेनेट ला परिस्थीती समजावून सांगितल्या नंतर त्यांनी शूटींग रद्द करायचे ठरवले आणि टीम आपापल्या स्टुडीओत परत गेली.

रोझी डीमेलो चे तसे कुणी फारसे नातेवाईक भारतात नव्हते. जे होते त्यांना अ‍ॅनाने बातमी कळवली.

ऑर्थर चा एकमेव भाऊ होता तोही राहात होता ऑस्ट्रेलीयात आणि इतर काही नावापुरते दूरचे नातेवाईक होते.

त्याला ही बातमी अ‍ॅनाने कळवली होतीच.

रविवारी दुपारी जड डोळ्यांनी अ‍ॅना ने लॅपटॉप काढला.

ती फाईल ओपन केली. कसलाही पासवर्ड न टाकता ओपन होवू शकणार्‍या फाईलही त्यात खुप होत्या.

त्यात विविध प्रकारची माहिती होती.

आतापर्यंत अ‍ॅनाला वडीलांच्या या जॉबबद्दल जास्त काही माहिती नव्हते. आईकडूनचे जे काय ते तीने ऐकले होते. या लॅपटॉपबद्दल सुद्धा तीला आताच माहिती झाले होते.

जहाजावरच्या जीवनावरच्या काही नोंदी असलेली पासवर्ड असलेली एक फाईल तीने ओपन केली.

त्या फाईलमध्ये तीच्या वडीलांनी लिहिलेली डेव्हिल्स स्क्वेअर बद्दलची माहिती होती. फाईल बरीच मोठी होती.
तीने वाचायला सुरुवात केली:

"
साऊथ अटलांटीक ओशन जवळच्या "साऊथ जॉर्जिया" या यु.के. च्या अधिपत्याखाली असलेल्या बेटाच्या थोडे खाली दक्षिणेकडे गेले असता एक चौकोनी आकाराचे बेट आहे. ते बेट आणि त्याच्या आसपासचा भाग मिळून डेव्हिल्स स्क्वेअर म्हणून ओळखले जाते.

तसे त्या बेटाचे नाव कागदोपत्री - जॉर्जियन स्क्वेअर आयलॅण्ड असे आहे.
त्या बेटावर जंगल आणि मोठमोठे पहाड आहेत. त्या पहाडांचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील मातीचा रंग हिरवा आहे.

हे बेट तसे सर्वज्ञात नाही. फार थोड्या लोकांना याबद्दल माहिती आहे. त्या बेटाच्या आजूबाजूला अनेक छोटीछोटी बेटे आहेत. असे म्हणतात की काही बेटांवर समुद्री चाचे वास्तव करून असतात.

डेव्हिल्स स्क्वेअर हे बेट मोठे चमत्कारीक आहे.
त्या बेटाबद्दल आणि आसपासच्या समुद्रा बद्दल अनेकांना वेगेवेगळे चमत्कारीक आणि भीतीदायक अनुभव आले आहेत!!!
मी जहाजावर असतांना त्याबद्दलच्या, त्यावर वास्तव्य करून असलेल्या चाच्यांबद्दलच्या अनेक कथा ऐकायचो. तेथे खरोखरीच चाचे होते की नाही माहीत नाही पण, तेथे जाण्यार्‍या जहाजांवर चाचे अनेकदा हला करत हे नक्की! ते चाचे कोठून येत, कोठे जात कुणाला नीट सांगता येत नाही....

पण ते येत. अचानक येत. बरोबर त्यांना जहाज येण्याचा सुगावा लागे आणि ते जहाजावर दाखल होत.
त्यांच्या ग्रुपमध्ये एक स्त्रीही असायची. मोठी सुंदर, मादक आणि अद्भुत स्त्री असायची ती.....

तो प्रसंग माझ्या चांगलाच आठवणीत आहे....

एकदा माझी नियुक्ती लंडनहून साऊथ जॉर्जिया कडे जाणार्‍या जहाजावर होती. जहाजावर असलेल्या अनेक टेलीकॉम इंजिनियर्स पैकी मी एक होतो.

आमच्या तीन शिफ्ट मध्ये ड्युटीज असायच्या. कामाव्यतिरिक्त उरलेल्या वेळात मी आमच्या स्पेशल रुममध्ये महत्त्वाचे प्रसंग फाईल्स मध्ये लिहायचो. मला जलप्रवास खुप आवडतो. माझ्या सोबत मी माझा लॅपटॉप नेहेमी बाळगतो. महत्त्वाच्या नोंदी करण्यासाठी....पण बरेचदा घरी आल्यानंतरच घडलेले प्रसंग मी लिहीतो.

...
जहाज साऊथ जॉर्जिया कडे जात होते. हाडे गोठवून टाकणारी थंडी. सगळे काही सुरळीत चालले होते. रात्र झाली. त्या रात्री माझी ड्युटी होती.."