Android app on Google Play

 

१) भारत बोलावतोय!

 

लंडन शहरातल्या ट्यूब (लोकल ट्रेन्स) मध्ये प्रवास करत असतांनाच त्याला तो कॉल आला. असा एक कॉल ज्याने आपले आयुष्य खुप बदलणार आहे, आपले ते पूर्वायुष्य आपल्याला पुन्हा भेटणार आहे याची त्याला पुसटशीही जाणीव नव्हती.

लंडन शहरातल्या एका प्राणिसंग्रहालयाला भेट देवून त्याची सगळी माहिती रेकॉर्ड करून ती तो काम करत असलेल्या चॅनेलवर लाईव्ह टेलीकास्ट करून झाली होती आणि आता तो पुन्हा यु.एस.मध्ये परतणार होता. त्यानंतर त्याला दोन दिवस सुट्टी होती आणि मग पुढची असाईनमेंट येण्याची तो वाट बघणार होता.

पण ट्रेनमध्येच त्याला तो कॉल त्याला आला आणि -

"
गुड मॉर्निंग मिस्टर अमेया. हाऊ आर यु? (सुप्रभात अमेय. कसा आहेस?) "
-
पलीकडून कॉल आला तो त्या चॅनेलचे आशीया खंडातील कार्यक्रमांचे काम बघणारे लेस्टर बेनेट यांचा.

"
या! आय एम गुड. हाऊ अबाऊट यू? ( मी ठीक आहे. आपण कसे आहात?)" - अमेय

"
फाईन. अमेया, देयर इज अ‍ॅन न्यू असाईनमेंट फॉर यु. यु वुड लाईक ईट इन फॅक्ट! (फाईन. अमेय, तुझ्यासाठी एक नवीन काम आहे. खरी गोष्ट तर अशी आहे की ते काम तुला खुप आवडेल.) " - लेस्टर

"
या. टेल मी सर. आय एम रेडी. बट ऑन्ली आफ्टर संडे. लेट मी टेक सम ब्रेदिंग स्पेस ऑन संडे.
(
होय. चालेल. पण रविवार नंतरच. मला थोडा रविवारी आराम करु द्यात..)" - अमेय

"
नॉट अ‍ॅन इश्यू. टेक यूर टाईम.
बट बी अवेअर दॅट, द असाईनमेंट इज इन युवर ओन कंट्री..
(
चालेल. पण लक्षात घे की पुढचे तुझे काम हे तुझ्या भारतातले आहे.)" - लेस्टर

ट्यूब मध्ये आता त्याला बसायला जागा मिळाली. खिडकी बाहेर बघता बघता तो बोलायला लागला.

"
दॅट्स ग्रेट. आय वुड डेफिनेटली लाईक टू गो देयर..( फारच छान. मी नक्कीच तेथे जाईन)" - अमेय

लेस्टर पुढे म्हणाला -

"
यु हॅव टू गो टू द शार्वारी जंगल्स इन मध्या प्रडेश... डिटेल्स विल बी सेण्ट टु युर ईमेल आयडी ameya.a@naft.com - अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हान्स विल बी क्रेडीटेट टू युर अकाऊंट. ऑन वेन्सडे, त्रीशा फ्रॉम मुंबई-ऑफिस अ‍ॅण्ड भार्गवी फ्रोम डेल्ही-ऑफिस विल असिस्ट यु. बेस्ट लक! बाय.
(
तुला मध्य प्रदेशातले शर्वरी जंगल येथे जायचे आहे. कामाबद्दलचे बारकावे, माहिती हे ईमेल द्वारे पाठवले जातील आणि अ‍ॅडव्हान्स पैसे हे तुझ्या बँकेच्या अकाउंट मध्ये जमा करण्यात येतील. बुधवारी मुंबई च्या आपल्या ऑफिसमधून त्रीशा आणि दिल्ली ऑफिस मधून भार्गवी तुला मदत करायला येतील. शुभेच्छा. बराय.)!"

शर्वरी जंगल - नाव ऐकताच त्याच्या अंगावर शहारे आले. सरसरून काटे आले. आणि एका आठवणीने मन व्याकूळ झाले....

ते पाणी... तो जार्वार पर्वत. ढग दाटुन आलेले. पर्वतावर पाऊस पडत असतांना पर्वता वर त्याला दिसलेले ते दृश्य...

आपल्याला तेथे जायला मिळणे हा योगायोग आहे की नियतीचा ठरवलेला डाव?... नियती.. भाग्य... असे खरेच काही असते का? आपण हे जन्मापासून मृत्युपर्यंतचे जीवन जगतो ते कसे असावे हे कोण ठरवतं? आपण स्वत: ? की दुसरंच कुणी?

त्याला तशा बरेचदा भारत आणि आसपासच्या देशातील कामे मिळत होती. पण मध्य प्रदेशात त्याला प्रथमच आता पाठवण्यात येणार होते.

भारतात जायला मिळाल्याने त्याला आनंद नक्कीच झाला होता. सगळ्यांची भेट होणार होती.

तो - म्हणजे - अमेय आचरेकर हा एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आणि हौशी प्रवासी. जीममध्ये जावून जावून सिक्स पॅक अ‍ॅब्स कमावलेले. लहानपणापासून साहसी. वय वर्षे - २५. अजूनपर्यंत अविवाहित. त्याचे आई- वडील मुंबईत विले पार्ले येथे त्याच्या मोठ्या भावासह - म्हणजे अमोल सोबत राहात होते.

अमेय हा जगप्रसिद्ध अमेरिकन चॅनेल - "नेचर, अनिमल्स, फुड अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स" (NAFT - नाफ्ट) मध्ये काम करत होता. नाफ्ट हे चॅनेल जगभरातील निसर्ग आणि प्राणी यांचेबाबत विविध अंगानी विचार करून त्याची माहिती लोकांसमोर आणते. तसेच विविध प्रकारची स्थळे तेथील संस्कृती, तेथील खाद्यपदार्थ याबद्दल विविध प्रकारची माहिती चोवीस तास पुरवत असते. जगभर या चॅनेलचे असंख्य चाह्ते आहेत. त्याच चॅनेलचा नुकताच जन्मलेला जुळा भाऊ - "नॅचरल ऑर सुपरनॅचरल (Natural Or Supernatural- NOS- नॉस) " हाही लोकांमध्ये लोकप्रिय होत होता.

त्यांची सर्वात मोठी बहीण आरती ही लग्नानंतर यु.एस. ला सेटल्ड होती. तीचे मिस्टर एका शहरात आयटी क्षेत्रात ट्रेनर.

अमोल हा विवाहीत. अमोल हा एका आयटी कंपनीत नोकरीला. त्याची पत्नी डॉक्टर सौ. आसावरी आंबेकर - आचरेकर. अमेयला लहानपणापासूनच फोटोग्राफी ची सुद्धा आवड होती.

वडीलांनी दोघांना त्याच्या आवडीच्या क्षेत्रात करीयर करण्याची मोकळीक दिली होती.

त्याच्या भावाला अमोलला यु.एस. , यु. के मध्ये सेटल होण्यात एवढा रस नव्हता. पण तो एक दोन वेळा परदेशात जावून आलेला होता.

वडीलांचे भाऊ अशोकराव हे मध्य प्रदेशातल्या एका छोट्याश्या खेड्यात - आसंद येथे राहात होते. त्यांची तेथे शेत्ती असल्याने आणि ती व्यवस्थित पैसा मिळवून देत असल्याने ते तेथेच असत. त्यांच्या वडीलांसोबत.

...
रविवारी पुन्हा एकदा क्रुझ वरची सफर केल्यानंतर संध्याकाळी तेथील त्याची एक मैत्रीण अ‍ॅना हॉफमन हीला तो भेटायला गेला. दुसर्‍या दिवशी - सोमवारच्या दुपारच्या फ्लाईटचे तिकिट होते.

रविवारी तीने त्याला घरी बोलावण्या ऐवजी त्याला वेस्टमिन्स्टर स्टेशन जवळ बोलावले. लंडन आय जवळ तीची वाट बघत तो उभा राहीला.

विचारांत असतांनाच त्याचे लक्ष समोरच्या एका जोडप्याकडे गेले. ते जोडपे एकमेकांचे चुंबन घेत असतांनाच त्याला अ‍ॅनाची प्रकर्षाने आठवण व्हायला लागली आणि त्याने तीला परत फोन लावला...