Get it on Google Play
Download on the App Store

वेद, अवेस्ता, इस्लाम आणि प्राचीन अरब प्रदेश आणखीन खूप काही

संपूर्ण लेखांत अनेक विषयांतरे आहेत पण खूप माहिती असल्याने वाचायला हि लेखमाला मनोरंजक असेल.

== झरतृष्ट्र, अवेस्ता आणि ऋग्वेद ==

ऋग्वेदातील दहा राजा मधील युद्धांत सुदास चा आश्चर्यकारक पद्धतीने विजय होतो[१]. काही इतिहासकारांच्या ह्या कथेतील काही भाग सत्य आहेत. सुदास हा तृत्सू जमातीचा राजा असून तो इंद्राच्या मदतीने इतर नऊ राजांना मारतो किंवा ते पळून जातात. ह्या नऊ जमातीची नावे ऋग्वेदात दिली असून त्यातील ८ जन एक तर इराणी आहेत किंवा ग्रीको-इराणी आहेत. १ जमात ज्यांचा राजा "भेद" हा होता हि नक्की कोण होती हे मात्र ठावूक नाही.

इराण आणि भारत ह्यांच्यातील हे वैषम्य अश्या प्रकारे इस्लाम-पूर्व आहे. हे वैषम्य अनेक दुसर्या प्रकारे सामोरे येते. असुर म्हणजे राक्षस हे आम्हाला सर्वांनाच ठावूक आहे. पण ह्या शब्दाचा उगम काय आहे ? ऋग्वेदात युद्धाच्या आधी असुर हा शब्द "प्रचंड शक्तिशाली" अश्या स्वरूपाने वसिष्ठ ऋषी करतात. युद्धाच्या नंतर असुरांतक अश्या रूपाने अग्नीची स्तुती केली जाते म्हणजे "शक्तिशाली लोकांचा कर्दनकाळ". ह्या नंतर असुर हा शब्द खलनायकी स्वरूपांत विविध ठिकाणी होत गेलेला आढळतो. आज आम्हाला असुर आणि राक्षस ह्या शब्दांत फरक आढळत नाही. देव हा शब्द आम्ही जास्त सकारात्मक दृष्टीने बघतो. देव म्हणजे चांगले आणि असुर म्हणजे वाईट असा आमचा आज दृष्टीकोन आहे.

इराणी अवेस्ता मध्ये देव हा शब्द नकारात्मक दृष्टीकोनाने येतो तर असुर (अहुर) हा शब्द मात्र सकारात्मक दृष्टीकोनाने येतो. वरुण, अग्नी इत्यादी शब्द सुद्धा इराणी आणि भारतीय लोक थोड्या वेग वेगळ्या स्वरूपांत पाहतात आणि काळाच्या ओघांत आज आम्ही जुने अर्थ विसरून गेले आहोत. वरुण म्हणजे इंद्राची sidekick असे कदाचित आज आम्हाला वाटत असेल पण वेदिक साहित्यांत वरून आणि इंद्र ह्यांचा संबंध बदलत जातो. इराणी आणि भारतीय लोकांच्या मध्ये जे राजकीय आणि सामाजिक बदल घडल गेले त्याचा प्रभाव लोकांच्या वरुण-इंद्र विषयी दृष्टिकोनावर पडत गेला असे वाटते. "अहुरा माझदा" हा इराणी देव म्हणजेच वरून असे भारतीय लोकांचा समाज होता म्हणून आणि वरुणाला अक्षरश: असुर ठरविण्यात आले आणि नंतर जसे इरनिअन लोकाचें "threat" कमी झाले तसे वरुणाला इतर सर्वसाधारण देवां मधील एक ठरवून इंद्राच्या बाजूला बसविण्यात आले असावे, नक्की कारण समाजणे शक्य नाही.

झरतृष्ट्र ह्याचा काळ सुमारे ३००० ख्रिपु असू शकतो. ह्याने इंद्र आणि देव ह्यांना दुष्ट ठरवले आणि वरूण म्हणजे अझुरा माझदा ह्याला एकमेव देव ठरवले. ह्याच्याच शिकवणीतून देव वि. असुर अशी हि दुष्मनी निर्माण झाली अर्थांत ह्याला राजकीय, वांशिक, भाषिक इत्यादी संदर्भ नेहमी प्रमाणे आहेतच. पण महमदपूर्वी पश्चिम अफगाणीस्थानातील एका माणसाने "एक देव" अशी संकल्पना निर्माण करून इतर देवांची देवळें उध्वस्थ करण्याचा प्रयत्न केला होता हे लक्षांत घेणे आवश्यक आहे. झरतृष्ट्र ह्याला विशेष यश आले नाही. वरुण शिवाय मित्र इत्यादी देवांची भक्ती लोकांनी चालूच ठेवली पण त्याच वेळी झरतृष्ट्रला लोकां मध्ये प्रोफेट पद सुद्धा मिळाले.

काळाच्या ओघांत कवी आणि आणव ह्या दोन जमातींनी झरतृष्ट्रची शिकवण चालू ठेवली आणि पुढे दहा राजांच्या युद्धांत सुदासच्या विरुद्ध भाग घेतला.

== वसिष्ठ, योग, अथर्ववेद आणि जादू टोणा ==

सुदासचे गुरु वसिष्ठ होते. दहा राजांच्या युद्धांत त्यांनी सुदासचे मार्गदर्शन केले. ऋग्वेदातील त्यांच्या लिखाणातून आम्हाला त्यांचा दृष्टीकोन समजतो. विरुद्ध बाजुतील प्रत्येक राजाचे त्यांनी वर्णन करून हे का आपले शत्रू आहेत ते सांगितले. वसिष्ठ ना जादूटोणा अजिबात आवडत नसून इराणी लोक (असुर) त्याचा खूप प्रयोग असे त्यांचे मत होते. हे युद्ध म्हणजे मानवी शक्ती आणि आसुरी जादू ह्यांचे युद्ध आहे असे त्यांनी सांगितले. कधी कधी वेदत्रयी मध्ये अथर्व वेदाला (चतुर्वेद मधून) वगळेले जाते ह्याचे कारण अथर्व वेद हा इराणी देवाच्या (अथर्वण) नावाने ओळखला जातो आणि जादूटोणा हा त्याचा प्रमुख गाभा आहे.

दैवी शक्ती विषयी मानवाला वाटणारे आकर्षण आणि संशय (Skepticism) हा फार जुना आहे.

योग मध्ये प्रत्यक्ष अनुभवला प्राधान्य दिले जाते. त्याशिवाय हिंदू धर्मामध्ये "प्रत्यक्ष अनुभव" हा इतर सर्व ज्ञाना पेक्षा जास्त चांगला समजला जातो. गुरु वसिष्ठ ह्यांनी ह्या प्रकारच्या विचारसरणीचा पाया रचला असे समजायला हरकत नाही. अर्थांत वसिष्ठ स्वतः मंत्र रचून इंद्राला पावूस पाडण्यास भाग पडतात, त्यांच्या दृष्टीकोनातून ती मानवी प्रतिभा असून जादूटोणा नाही. Skepticism ह्या शब्दाचा अर्थ सापेक्ष पद्धतीने घेणे जरुरी आहे.

आजकाल वेदिक लिखाण म्हणजे अमानवीय आहे आणि मनुष्य निर्मित नाही असे सांगितले जाते पण प्रत्यक्षांत, वेद लिहिणारे मुनी मात्र तसे मानत नव्हते. कुराण पमध्ये देव माणसाला संबोधित करतो तर वेदांत माणूस देवांना संबोधित करतो.

आगमा (पुस्तकी ज्ञान) विरुद्ध अनुभव ह्याच्या मधील हि रस्सीखेच ऋग्वेद पर्यंत जाते पण पुन्हा पुन्हा सामोरे येते. पतंजली ह्यांनी योगाचा पाया रचला. त्यांच्या मते योग करून ब्रम्हज्ञान प्राप्त केले जावू शकते. शंकरने ह्याच कारणासाठी पतंजलीवर टीका केली कि पंतजली कुठेही वेदांचा उल्लेख करत नाहीत. त्याच प्रमाणे विवेकानंदानी आधुनिक काळांत अनुभवला प्राधान्य देवून आगमा वर सडकून टीका केली.

== देव ==

देव शब्दाचा अर्थ "bright one" असा होतो. देव शब्द संस्कृत असला तरी "चमकणार्या वस्तूना" चमत्कारी मानणे हि जुनी मानवी स्वभावगत गोष्ट आहे. रात्रीच्या वेळी आकाशांत चमकणार्या तार्यांना पाहून लोकांना हि कल्पना समजली असावी.

आज काळ आम्ही घरांत झोपतो पण पूर्वी रात्र झाली कि मानवाच्या हालचाली बंद होवून कथा सांगणे किंवा आकाशांत पाहणे इत्यादी गोष्टीच लोक करत असत. आकाशांतील चमकणार्या गोष्टी आपल्या आयुष्यावर प्रभाव पडतात हा विचार इतका जुना आणि मानवी विचारांत आज सुद्धा वास करून आहे.

दिशा दर्शन, स्थलांतर इत्यादी गोष्टी साठी रात्रीच्या अंधारातील तारे फार मदतशीर होते. लक्षावधी वर्षा पासून मानवच नाही तर इतर प्राणी लोकांचे मेंदू सुद्धा सूर्य, तारे इत्यादीतील patterns समजण्यासाठी उत्क्रांत झाले आहेत. हजारो मैल दूर स्थलांतर करणारे पक्षी तारे पाहून दिशा ठरवितात. सर्वांत चमत्कारिक उत्क्रांती मात्र मधमाश्यांची आहे.

एखादी माशी पोळ्या पासून सुरुवात करते आणि सूर्याच्या सापेक्ष आपले गती आणि स्थान आठवत फुलांच्या शोधांत जाते. फुले मिळताच त्याच पद्धतीने परत येत आपल्या पोळ्यातील माशांना हा सगळा Route सांगते. कशी सांगते ? तर हवेंत विशिष्ट पद्धतीने हालचाल करते जी हालचाल आपल्या डोळ्यांनी पाहून इतर माश्या आपल्या मेंदूत Route फीड करतात. पण इतकेच नाही समजा संपूर्ण प्रवासाला आधीच्या माशीला समज ३० मिनटे लागली तर त्या मिनिटांत सूर्याचे स्थान आकाशांत बदलते. पण Route सांगताना मूळ माशी ते सुद्धा ध्यानात ठेवून नवीन Route encode करते. [२]

मधमाशी जर सूर्या च्या अस्तित्वाने इतकी प्रभावित होत असेल तर मानवी कल्पनेला चंद्र तार्यांनी प्रभावित न केले तरच अश्चर्य होते.

पण संस्कृत मध्ये देव तर इतर भाषांत काय ?

== अल्लाह ==

सुमेरिया (आजचा इराक ३००० ख्रिपु) मध्ये अक्कदिअन भाषा प्रचलित होती. आपल्या इंडो-युरोपिअन (संकृत इत्यादी) भाषांशी त्याचा संबंध नाही ह्या भाषेंत "bright one " चा शब्द होता El. भाषेंत आम्ही ज्या प्रकारे सोमदेव, रामदेव लिहितो त्या प्रमाणे अक्कादियान भाषेंत El हा शब्द वापरला जाते असे. महंमद ला जो गब्रिएल नावाचा दूत दिसला त्याच्या नावाचा अर्थ "शक्तिशाली - देवा प्रमाणे" असा होतो. मायकेल चा अर्थ "देवा-सारखा" होतो. [३] [४]

हिब्रू मध्ये El चे इलोहा आणि अरेबिक मध्ये इलह होते. अरेबिक मध्ये इल - इलाहा म्हणजे "The - El" होते. अल्लाह हा शब्द ह्यापासून प्रचलित झाला. पण हा शब्द इस्लामिक नाही, इस्लाम पेक्षा जुना असून ज्या मानवी कल्पनेने देव ह्या शब्दाला जन्म दिला त्याच मानवी कल्पनेत त्याचे मुळ आहे. सध्याचा काळांत इस्लाम ह्या शब्दाच्या मूळ अर्थाला मानतो कि नाही ठावूक नाही.

अल-इलाहा ह्याचा अर्थ "देवां मधील शक्तिशाली देव" होतो. म्हणजे अनेक देवांच्या समूहात आपल्या इष्टदेवतेला लोक ह्या प्रकारे संबोधित करत. सध्या दूरदर्शनवर "देवों के देव महादेव" हे चालू आहे पण कुणी "देवों के देव नारायण" किंवा "देवों के देव गणपती" काढले तरी चुकीचे ठरत नाही त्या प्रकारे.

इस्लाम प्रचलित झाल्यापासून अल्लाह म्हणजे "एक देव" अशी संकुचित व्याख्या ह्या शब्दाची झाली. पण "देवों के देव" आणि अल्लाह चा संबंध हा आहे.

== काबा आणि शिवलिंग ==

काही लोक काबा म्हणजे शिव मंदिर आहे असे सनगतत. त्यांत काहीही तथ्य नाही. पण एका वेगळ्या दृष्टीकोनाने शिव आणि काबा ह्यांचा संबंध आहे. काबामध्ये एक उल्का पडली आणि त्या भागांतील विविध जमातींनी त्याची पूजा सुरु केली. काळाप्रमाणे "हुबळ" असे ह्या देवाचे नाव झाले. हुबळ म्हणजे "चंद्र देव". गुढगे टेकून हुबळ पुढे अल्लाह म्हणून लोक इस्लाम पूर्व काळांत लोक प्रार्थना करत. [५(सावरकरांनी सुद्धा ह्या विषयावर विस्तृत लेखन केलेले आहे)

हिंदू व्यापारी जेंव्हा अरेबिया मध्ये व्यापारा साठी जात असत तेंव्हा ते हुबळच्या पुढे प्रार्थना करत. गुजरात मधील सोमनाथचे भक्त असलेल्या व्यापार्यांना हुबळ हा चंद्र देव आपला वाटला ह्यांत आश्चर्य नाही. शिव सुद्धा चंद्रधारी असतो.

हुबळ हा पुरुष देव असून त्याच्या ३ स्त्री देवी असतात. सूर्य देवी (अल-इलाहत), शुक्र देवी (अल-उज्जा) आणि नष्ट करणारी देवी ( अल-मनात ). पार्वती, दुर्गा आणि काली आणि ह्यांच्या मध्ये साम्य आहे.

गजनवी ने जेंव्हा सोमनाथवर हल्ला केला तेंव्हा त्याच्या प्रमाणे मुहमदने अरब प्रदेशांतून हाकलून दिलेल्या वरील तिन्ही देवीनी सोमनाथ मंदिरात आश्रय घेतला होता.[6] ओसामा बिन लादेन ने अमेरिकेला "हुबळ" असे संबोधिले होते.

"ईश्वर अल्लाह तेरो नाम" हे कदाचित इस्लाम ला मंजूर नसेल पण हिंदू दृष्टीकोनातून ते सत्य आहे कारण ईश्वर आणि अल्लाह शब्दांचा अर्थ एकच आहे.

मुस्लीम लोक आणि हिंदू लोकांत अनेक गोष्टीमुळे तिढा आहे. काही लोकांच्या मते भारतीय मुस्लिम लोकांचे पूर्वज मुल हिंदू आहेत हा मुद्दा घेवून दोन्ही धर्माचे लोक एकमेकांना आपले मानू शकतात. पण माझ्या मते त्याची सुद्धा गरज नाही, मुस्लीम लोकांनी स्वतःला अरब मुळाचे जरी समजले तरी हिंदी मुस्लिम लोकांचे संबंध फार जुने असून अगदी धार्मिक दृष्टीकोनात सुद्धा प्राचीन काळांत त्यांच्या मध्ये काही समान दुवे होते जे सत्य सर्वानीच मानले पाहिजे.

[१] https://en.wikipedia.org/wiki/Battle_of_the_Ten_Kings
[२] http://jeb.biologists.org/content/216/11/2129
[३] https://en.wikipedia.org/wiki/El_%28deity%29
[४] http://koenraadelst.blogspot.com/2016/02/pluralism-in-ilas-city.html
[5] https://en.wikipedia.org/wiki/Hubal
[6] https://en.wikipedia.org/wiki/Man%C4%81t