Get it on Google Play
Download on the App Store

मामा आजोबांचे रहस्य !

सत्यघटना आहे. अनेक वर्षे उलटवून गेल्याने आणि मी लहान असल्याने स्मृती थोडी अंधुक आहे पण भुताटकी सारखे अनुभव ह्या बाबंतीन हा माझा ५ क्रमांका वरचा अनुभव आहे. (इतर अनुभव आणखीन कधी लिहीन). माणसांची नावे बदलली आहेत.

साधारणतः १९९८-९९ मधील गोष्ट असावी. माझ्या मामाची मुलगी रम्या आमच्याकडे राहायला आली होती. ती साधारणतः ५ वर्षांची असेल. अचानक एका शुक्रवारी वडील लवकर घरी आले आणि "आपण आता मामा-आजोबा कडे जायचे" असे म्हणाले. मामा-आजोबा म्हणजे वडिलांचे मामा. फॉरेस्ट मध्ये ऑफिसर होते आणि कर्नाटकातील कुठल्यातरी दुर्गम भागांतील वनात सरकारी बंगल्यांत राहत होते. ( नंतर समजले कि बंगला त्यांच्या मालकीचा होता सरकारी नाही.) मी फक्त एकदा तिथे गेले होते. मी, वडील, रम्या आणि आमची डोमेस्टिक हेल्प + मानलेली बहीण सुनीता अशी चारजण निघालो. आमचे गंतव्य स्थान उडुपी जवळ कुठे तरी होते इतकेच आठवते.

वडिलांची एस्टीम गाडी होती. शुक्रवारी संध्याकाळी निघालो आणि शनिवारी सकाळी आम्ही तिथे पोचलो. बंगल्याची चावी वडिलांकडे होती आणि मामा-आजोबांचा पत्ता नव्हता. मला थोडे आश्चर्य वाटले पण मामा-आजोबा आणि वडिलांचा घनिष्ट संबंध असल्याने मी जास्त विचार नाही केला. वाटेत कुठल्या तरी हॉटेल मधून वडिलांनी भरपूर अन्न पदार्थ घेतले होते. बरोबर सुनीता हि आमची नोकर सुद्धा होती तिने सर्व काही गरम वगैरे करून आम्हाला वाढले. वडील प्रचंड भ्रमंती करत असत त्यामुळे आम्हाला सुनिताचीच जास्त सवय होती.

वडील "तुम्ही इथेच थांबा बाहेर पडून नका" अशी सक्त ताकीद देऊन बाहेर गेले ते अगदी संध्याकाळीच परतले. मामा-आजोबा बरोबर येतील ह्या आशेने आम्ही वाट पाहत बसलो होतो पण ते काही आले नाहीत. शेवटी मी वडिलांना प्रश्न केलाच तर त्यांनी "अग त्यांनाच तर शोधायला गेलो होतो. येतील ते उद्या." असे उत्तर त्यांनी दिले.

मामा-आजोबा रिटायर झाले असले तरी आपल्या जुन्या कामातच गुंग राहत. त्यांनी म्हणे काही नवीन प्रकारची फुलपाखरू शोधली होती. ह्या शिवाय अनेक शिकारीत त्यांचा सहभाग होता. त्यांच्या कडे अनेक बंदुका होत्या. बंगल्यांत रानटी डुक्करांचे दात पासून, सापाच्या कातड्या पर्यंत काहीही मिळत असे. त्याशिवाय अनेक पुस्तके, मॅगझीन ह्यांचा अक्षरशः ढीग पडला होता. मामा आजोबाना आजी सुद्धा होती हे मला त्याच दिवशी समजले त्यांचा एक मोठा फोटो चंदनाचा हार लावून दिवाणखान्यात होता. त्या अतिशय तरुण वाटत असल्याने बहुदा खूप वर्षे आधीच दगावल्या होत्या. वडिलांनी त्या विषयावर बोलायला विशेष रूच ना दाखविल्याने मी सुद्धा जास्त विचारणा करायला गेले नाही. (नंतर समजले कि मामा आजोबांच्याच हातातून चुकून बंदूक मिसफायर झाली आणि त्यांना गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला होता.)

बंगल्याच्या दुसर्या मजल्यावर आमची झोपण्याची सोय झाली होती. गांवातील काही लोक वडिलांना सोबत देण्यासाठी आले होते वडिलांची आणि त्यांची बालपणा पासूनची ओळख असल्याने त्यांच्या गप्पा गच्चीवर चांगल्याच रंगल्या होत्या. काही लोक गच्चीवरच झोपले तर वडील मामा-आजोबांच्या खोलीत झोपले. त्यांच्या बाजूला एक फार मोठा हॉल होता जिथे कोपऱ्यांत एक टाईप रायटर ठेवला होता आणि तिथे कागदांचा ढीग होता. बाजूला जुनी कॉट होती. तिला सुनीताने साफ सुफ करून ठेवले होते.

मी आणि राम्या कॉट वर झोपलो तर सुनीता खाली अंथरून पसरून झोपली. खूप उशिरा पर्यंत वडिलांच्या मित्रांचे बोलणे ऐकू येत होते. काही तरी मोठा बेत आखला जात होता असे वाटत होते. रात्री मला जाग आली ती रम्याच्या हालचालीने. रम्या बाजूला नव्हती. मी दचकून उठले पण ती शांतपणे कॉटवर चढत होती. तिच्या चेहऱ्यावर जराही भीती नव्हती. खाली सुनीता शांत पाने झोपली होती त्यामुळे तिलाही कदाचित रम्याच्या हालचालींची जाग नव्हती. तिला झोपेत चालायची वगैरे सवय सुद्धा नव्हती. चंद्राचा पांढरा प्रकाश खिडकीतून आंत येत होता आणि ते दृश्य फार सुंदर होते. मी रम्याला जास्त काही विचारले नाही. ती शांत पणे बाजूला येऊन झोपली. काही वेळाने मला बाथरूम ला जायला झाले. एवढीशी रम्या एकटी बाहेर जाऊ शकते तर मी का नाही असा विचार करून मी आधी उठले. दरवाजा हॉलच्या एकदम दुसऱ्या बाजूला होता. मी इथवर पोचले खरे पण मला भीती वाटली. दाराच्या बाहेर जिन्यावर पूर्ण अंधार होता. वरील मजल्यावर बाथरूम होता कि नाही हे सुद्धा मी पहिले नव्हते. बाथरूम खाली होता हे ठाऊक होते. मी मागे जाऊन सुनीताला उठवले. ती बिचारी डोळे चोळीत उठली. ती माझ्या बरोबर जिना उतरून खाल पर्यंत आली. "तुझे आजोबा आले आहेत बरे" असे तिने मला खाली जाताना सांगितले. "तुला ग कसे समजले?" मी तिला विचारले. "मी उठले होते ना काही वेळा मागे तेंव्हा ते खाली काही तरी कागद वाचत बसले होते. साहेबानी फोटो दाखविला होता ना म्हणून मी ओळखले त्यांना" ती जिन्याचा खालीच राहिली. रम्य उठली आणि तिला एकटे वाटले तर ती घाबरेल ना म्हणून मी इथे जिन्याच्या वरच थांबते असे म्हणून ती वर थांबली. मी वाटेवरच्या दोनी लाईट्स पेटवून बाथरूम मध्ये पोचली. मामा आजोबा कदाचित झोपायला गेले होते त्यामुळे पुन्हा वर येई पर्यंत ते काही मला दिसले नाहीत. मी आणि सुनीता पुन्हा झोपायला गेलो.

सकाळी सुनीता आधीच उठून चहा बनावत होती. मी उठले आणि मी रम्याला उठवले. वडीलांचा पत्ता नव्हता. त्यांचा एक मित्र सकाळी दूध इत्यादी देऊन गेला होता. त्याचे घरात बाजूलाच होते आणि काही गरज पडल्यास सांगा असे त्याने सांगून ठेवले होते. ब्रेकफास्टला तरी मामा-आजोबांशी बोलायला मिळेल म्हणून मी आनंदित होते पण ते सुद्धा नसल्याने माझ्या आनंदावर विरजण पडले.

रम्याला मी "रात्री एकटीच उठलीस का ग?" असा प्रश्न केला. सुनीताला सुद्धा ह्याबद्दल काही ठाऊक नव्हते. "छे एकटी कुठे? आजी जॉब होते ना ? " तिने उत्तर दिले ? "आजी?" सुनीताने आश्चर्याने विचारले आणि मी सुद्धा आ वासला. मामा-आजोबानी दुसरे लग्न केले कि आणखीन कुणी महिला अली होती घरांत ? मला काही समजले नाही. "आजीने बाथरूम ची वाट दाखवली " रम्याने भाबड्या आवाजांत सांगितले.

"मी नाही बुवा कोणी बाई माणूस पाहिली." सुनीताने कप साफ करता करता सांगितले. मी थोडी विचारांत पडले पण वडील आल्यावर सर्व काही स्पष्ट होईल असाही विचार आला.

वडिलांचा पुन्हा पत्ता नव्हता. वडिलांच्या मित्राची बायको आम्हाला काही ख्याल प्यायला देऊन गेली. तिला फक्त कन्नड येत असल्याने आम्ही तिच्याशी जास्त संवाद साधू शकलो नाही पण तिची एक माझ्याच वयाची मुलगी होती ती मात्र थोडी फार हिंदी बोलू शकत होती. ती आमच्या बरोबर राहिली. तिने आजू बाजूची झाडे, एक विहीर, एक जुना कानाला इत्यादी अनेक गोष्टी दाखविल्या आणि आम्ही सुद्धा आनंदाने तिच्याबरोबर बागडलो.

संध्याकाळी वडील पुन्हा घरी आले. ते अतिशय निराश आणि दुःखी वाटत होते. "आम्ही निघुयात आता" त्यांनी आम्हाला सांगितले. "मामा-आजोबाना ना भेटताच ?" मला थोडे रडू आले. "अग पुन्हा कधीतरी. ते आज पोचणार नाहीत आणि अमी राहू शकत नाही. तुझ्याप्रमाणे मलाही भेटायचे होता ना त्यांना. " वडिलांनी म्हटले. वडिलांनी धावत वर जाऊन आपले बॅग आणले आणि सुनीताने सुद्धा त्यांचा मड जाणून तात्काळ आम्हा स्वरांचे बाडबिस्तर बांधून गाडींत टाकले. मला संताप आणि दुःख दोन्हीही वाटत होते. खरे तर मी ३-४ वेळचं मामा आजोबाना भेटली असेन. त्यांचा आणि माझा विशेष स्नेह होता असेही मी म्हणू शकत नाही. पण त्यांची पर्सनॅलिटीचं थोडी घुड प्रकारची असल्याने मला त्यांना भेटायला आवडले असते.

संध्याकाळचे ७ वाजले असतील तेंव्हा आणि वडिलांनी गाडी स्टार्ट मारली. मी पुढे जाऊन बसले. संताप डोक्यांत गेल्याने वडिलांकडे पाहवत सुद्धा नव्हते. माझे वडील अतिशय समजूतदार होते. त्यांना माझा राग समाजत होता पण त्याच्याकडे शब्द नव्हते. गाडी पोर्च मधून बाहेर अली आणि मागच्या सीटवरून मागे पाहणाऱ्या रम्याने "बाय बाय मामा आजू , बाय बाय मामा आजी" असे सुमारे दोनदा म्हटले. गाडी चालवत असतानाच वडिलांनी चमकून रम्याकडे पहिले. "मामा आजी ?" हे काय शिकवले तिला ?"
त्यांनी मला विचारले.

"मला कशाला विचारता ? तुम्हाला ठाऊक असेल ना ? मामा आजोबा काल रात्री तुम्हाला भेटून गेले मग नवीन आजीला हि भेटले असाल ना तुम्ही ? " मी रागाने वडिलांना विचारले. त्यांनी माझ्याकडे गोंधळून पहिले. "अग काय मूर्खां प्रमाणे बोलतेस ? मी कुठे भेटलो मामांना ? आणि हे मामा आजी प्रकरण काय आहे ? " मग त्यांनी "सुनीता ? हे कोणा बद्दल बोलत आहेत ठाऊक आहे का तुला?" तिला विचारले.

वडिलांच्या प्रश्नावर ती गोंधळून गेली. "आजोबा काल रात्री आले होते ना ? तुम्हाला नाही उठवले का त्यांनी ? मग सकाळी तुमच्या बरोबर गेले असतील असे मला वाटले. " तिने उत्तर दिले. वडिलांनी पुन्हा प्रश्नार्थक दृष्टिने रस्त्यावरची नजर हटवून मागे सुनिताकडे कटाक्ष टाकला. मी सुनीता आणि रम्य मिळून त्याच्यावर काही तरी ट्रिक करत आहोत असे त्यांना वाटले असावे. "आणि आजी?", "तिला फक्त रम्याने पहिले रात्री बाथरूम साठी उठली असता म्हणे आजीने तिले बाथरूम चा रास्ता दाखविला." मी उत्तर दिले.

वडील काहीही ना बोलता गाडी चालवत राहिले. त्यांची शांतता त्या भयाण सुनसान रस्त्यावर मला घाबरवून टाकत होती.

अनेक वर्षांनी मी मामा-आजोबांचा विषय वडीलां कडे काढला. एव्हाना सुनीता शिक्षण संपवून पोलीस खात्यांत कामाला लागली होती. रम्या दहावीची परीक्षा देत होती. उत्तरादाखल वडिलांनी भली मोठी कथा सांगितली. ते लहान असताना मामाच्या घरापासून काही अंतरावर जंगलांत एक कडा होता. तेथून एक लहानसा धबधबा नदीला मिळत असे. त्या कड्यावर वर पर्यंत कुणीही चढून गेला नव्हता. त्या धबधब्याच्या खाली अनेक लोक बुडून मेले होते. आणि मेले सुद्धा इतक्या आश्चर्यकारक पद्धतीने की त्यांचे शव सुद्धा हाती लागले नाही. पाणी फार तर गळ्याकडे पोचायचे पण त्या खोलींत सुद्धा कोण कसा गायब होऊ शकतो ह्याचेच सर्वाना आश्चर्य होते.

मामानी कारणाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. त्याकाळी क्स-रे मशीन, थर्मल इमेजिंग इत्यादी गोष्टी सहज पाने मिळत नव्हत्या आणि पाण्यात जायला लोक घाबरत. पण मामा आजोबानी प्रचंड कष्टाने म्हणे हे गूढ उकलले होते. त्यांनी आणि एका तरुण फॉरेस्ट ऑफिसरने संपूर्ण भागाचा भूगर्भीय सर्वे केला होता आणि धबधब्या पासून सुमारे १ किलोमीटर दूर जमिनी खाली लाईमस्टोनच्या भूमिगत गुफा आहेत असा तर्क लावला होता आणि एका ठिकाणी खड्डा खणून एक शाफ्ट सारखा रास्ता सुद्धा शोधला होता. मामा आजोबानी आणि त्या ऑफिसरने खाली उतरायचा निर्णय केला आणि वडिलांना त्या प्रमाणे फोन करून सांगितले. अतिशय लांब रोप टाकून म्हणे दोघेही जण खाली उतरले. पण २४ तास तरी रोप आंतून कुणी ओढला नाही आणि वरून लोकांनी ओढला तरी खालून काही प्रतिक्रिया आली नाही. मामानी वडिलांचा नंबर दिल्याने कुणीतरी फोन लावला आणि वडिलांनी तात्काळ धाव घेतली. त्यांच्याकडे पुरेसे अन्न, शिट्टी, आग लावण्याची साधने वगैरे सर्व काही होते. त्यांच्या हिशोबा प्रमाणे धबधब्याच्या खाली तलाव सदृश जे पाणी साचले आहे त्याचा बाजूला कुठे तरी एक भूमिगत पाण्याने भरलेली कॅन्यन आहे आणि ती सहज पाने डोळ्यांना दिसली नाही तरी कधी कधी लोकांना खाली ओढून घेता असा त्यांचा कयास होता.

दोघेही लोक गायब झाल्यानंतर लोकांनी रोप ओढायला सुरुवात केली. पण काही वेळ गेल्यानंतर रोप अडकला. जोरांत ओढणे म्हणजे दुसऱ्या बाजूला असलेला माणूस कड्या कपारींत अडकलेला असला तर ? नेव्हीचे अतिशय अनुभवी डायव्हर्स सुद्धा आले. त्यांनी सुद्धा आंत प्रवेश केला. आंत अंधार होता आणि एका टनेल सारखया भागांतून पाण्याचा प्रवाह होता नि रोप त्यांत आंत गेला होता म्हणे. डायव्हर्स नि खूप आवाज दिला पण प्रत्युत्तर आले नाही. त्या पानाच्या प्रवाहांत उडी मारणे धोक्याचे आहे म्हणून ते सुद्धा परत आले.

सलग दोन दिवस वडिलांनी दिवसभर तिथे आपला वेळ मामाच्या शोधांत घालवला. मामा आणि तो फॉरेस्ट ऑफिसर पुन्हा कधीही कुणालाही दिसले नाहीत. त्या गुंफा सुद्धा काही कुणी एक्सप्लोर केल्या नाहीत म्हणे.

पण सुनीता आणि रम्याला त्या घरी कोण दिसले ? सुनीताने तर फोटो पाहून आजोबाना ओळखले होते. वडिलांनी आपल्या सर्व मित्रांना निरोप देऊन घराच्या सर्व कड्या वगैरे लावल्या आहेत ह्याची पडताळणी केली होती. मी आणि वडिलांनी त्यानंतर त्या विषयावर अनेक तर वितर्क लावले. सुनीता एक दिवस घरी अली असता मी थट्टेने मामा आजोबांचा एक फोटो दाखवून ह्यांना ओळखतेस का असा प्रश्न केला तर तिने "हो ना ! तुझे मामा आजोबा. ह्यांना भेटलो होतो कि आम्ही एकदा. ओह सॉरी तुला नव्हते भेटले ते. किती राग आला होता तुला म्हणून ? आता कसे आहेत ते ? " असा प्रश्न केला!