९ सप्टेंबर २००२ – हावडा - नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस (१४० मृत्यू)
रात्री १० वाजून ४० मिनिटांनी हावडा - नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस गया आणि देहरी सोन यांच्या मध्ये असलेल्या रफिगंज स्टेशनवर रुळावरून घसरली ज्यामुळे १४० लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला मानवालाच जबाबदार धरावे लागेल कारण तिथले रेल्वेचे रूळ हे इंग्रजांच्या काळातील होते आणि अतिशय जुनाट आणि कमकुवत झालेले होते. मुसळधार पावसामुळे रूळ मधेच तुटला ज्यामुळे १०० किमी प्रती तास या वेगाने येणारी राजधानी एक्स्प्रेस रुळावरून घसरली.