Get it on Google Play
Download on the App Store

स्वास्थ्य

आस्था आणि भक्तीचे प्रतिक असा हवन करण्याचा विचार मनात येताच आत्म्यात उचंबळून येणारे ईश्वर प्रेम तसेच असते जसे एका मातेसाठी तिच्या गर्भातील जन्माला न आलेल्या बाळाच्या प्रती असते. ज्याला कधीही पाहिले किंवा ऐकले नाही, तरीही त्याच्याशी एक कधीही न तुटणारे नाते जोडले गेले आहे, हाच विचार करकरून आनंदी अवस्था जशी एका मातेची होते तीच तशीच अवस्था एका भक्ताची होते. या होमाच्या माध्यमातून तो आपल्या जन्माला न आलेल्या ईश्वराच्या प्रती भाव निर्माण करतो आणि त्या अवस्थेत मानसिक आनंदाच्या चरणसीमेवर पोचतो. या परम आनंदाचे फळ म्हणून मन विकारमुक्त होते. मेंदू आणि शरीरात श्रेष्ठ रसांचा (हार्मोन्स) स्त्राव होतो जो जुन्या रोगांचे निदान करतो आणि नवीन रोगांना येऊ देत नाही. हवन करणाऱ्याचे मानसिक रोग दहा पाच दिवसांपेक्षा जास्त टिकू शकत नाहीत.
होमात टाकण्यात येणारी सामग्री (लक्षात घ्या, ही सामग्री आयुर्वेदानुसार औषधादी गुणांनी युक्त झाडपाल्याची बनलेली असावी) अग्नीत पडून सर्वत्र व्यापते. घराच्या कानाकोपऱ्यात पसरून रोग पसरवणारे जीवाणू नष्ट करते. वैज्ञानिक शोधातून समजले आहे की होमातून पसरणारा धूर हवेतून पसरणाऱ्या रोगांचा संसर्ग करणाऱ्या विषाणूंना नष्ट करतो.