Android app on Google Play

 

जीवन

 

माझा जन्म झाला तेव्हा हवन झाला. पहिल्यांदा माझे केस कापले तेव्हा हवन झाला. माझे नामकरण झाले तेव्हा हवन झाला. जन्मदिनी झाला, गृह प्रवेशाच्या वेळी झाला, माझ्या व्यवसायाचा आरंभ झाला तेव्हा हवन झाला, माझे लग्न झाले तेव्हा हवन झाला, मुलं झाली तेव्हा हवन झाला, संकट आले तेव्हा हवन झाला, सुखं आली तेव्हा हवन झाला. एक प्रकारे पाहिले तर प्रत्येक मोठ्या कामाच्या वेळी हवन झाला. का? कारण माझी श्रद्धा आहे की हवन केले तर भगवंत सोबतीला येतील. मी कुठेही असलो, भगवंत सोबत असतील. कितीही कठीण परिस्थिती असो, भगवंत मला हरू देणार नाहीत. हवनकुंडात दिलेली एक एक आहुती माझ्या जीवनरूपी अग्नीला आणखीन विस्तृत करेल, त्याला उंच उठवेल. या जीवनाच्या अग्नीत सर्व पापे जळून स्वाहा होतील आणि माझ्या सत्कर्मांचा सुगंध दही दिशांत दरवळेल. मी पराभव आणि अपयश सर्वांची बीजे या हवन कुंडाच्या अग्नीमध्ये जाळून भस्म करून टाकतो जेणेकरून विजय आणि यश माझ्या जीवनाचे हिस्से बनावेत. या विश्वासाबरोबर हवन माझ्या जीवनात प्रत्येक कामात साथीला असतो.