Android app on Google Play

 

स्फटिक मणी

 

http://3.imimg.com/data3/ST/XT/MY-10421994/powerful-sphatik-shivlingam-500x500.jpg

स्फटिक मणी शुभ्र रंगाचा चमकदार असतो. हा सहज उपलब्ध होतो. तरीही त्याच्या खरेपणाची खात्री करून घेतली पाहिजे. स्फटिक मण्याची अंगठी देखील असते. बहुतेक लोक स्फटिक मण्याची माळ घालतात. अर्थात स्फटिक धारण करण्यासाठी आपले काही खास नियम असतात अन्यथा तो नुकसानकारक देखील ठरू शकतो. हा धारण केल्यामुळे सुख, शांती, धैर्य, धन, संपती, रूप, बल, वीर्य, यश, तेज आणि बुद्धि यांची प्राप्ती होते आणि याच्या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास तो मंत्र लवकर सिद्ध होतो. स्फटिक मण्याच्या अनेक चमत्कारांचे वर्णन ज्योतिष्यांच्या ग्रंथांमध्ये मिळते.