भूमिका
मणी हा एक प्रकारचा हिऱ्यासारखा चमकणारा खडा असतो. मणी खरच असायचे की नाही ही गोष्ट स्वतः एक रहस्यच आहे. ज्याच्या जवळ मणी असेल तो काहीही करू शकत असे. तुम्हाला कदाचित माहित असेल की अश्वत्थामा जवळ एक मणी होता ज्यामुळे तो महाशक्तीशाली आणि अमर झाला होता. रावणाने कुबेराकडून चंद्रकांत नावाचा मणी हिसकावून घेतला होता. अशी मान्यता आहे की मणी अनेक प्रकारचे असत. आज आपण पाहणार आहोत की कोणकोणते मणी असतात. मणीशी संबंधित कित्येक कथा आणि कहाण्या समाजात प्रचलित आहेत. याव्यतिरिक्त पौराणिक ग्रंथांमध्ये देखील मणी संबंधी किस्से भरपूर आहेत. मणी सामान्य हिऱ्यापेक्षा कितीतरी जास्त मौल्यवान मानला जातो. जैनांमध्ये मणिभद्र नावाचा एक महापुरुष होऊन गेला. असे मानले जाते की चिंतामणीला स्वतः भगवान ब्रम्हदेव धारण करतात. रुद्रमणीला भगवान शंकर धारण करतात. भगवान विष्णू कौस्तुभ मणी धारण करतात. याच प्रकारे आणखी देखील अनेक मणी आहेत ज्यांच्या चमत्कारांचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. चला पाहूयात प्रमुख ९ मण्यांच्या बाबतीत.....