Android app on Google Play

 

नीलमणी

 

http://ashirwadrashiratan.in/image/cache/catalog/download%20(4)-917x1000.jpg

नीलमणी एक रहस्यमय मणी आहे. अस्सल नीलमणी ज्याच्या जवळ असतो त्याला जीवनात भूमी, भवन, वाहन आणि राजपद यांचे सुख लाभते. त्याला नीलम देखील म्हटले जाते. अस्सल नीलम किंवा नीलमणी मधून निळा किंवा जांभळा प्रकाश निघतो, जो दूरपर्यंत पसरतो. जगातील सर्वांत मोठा नीलमणी तब्बल ८८८ कॅरेटचा असून तो श्रीलंकेत आहे आणि त्याची किंमत १४ करोड एवढी आहे. नीलम २ प्रकारचे असतात. १. जलनील आणि २. इंद्रनील. भारतात नीलमणी नावाचा पर्वत देखील आहे. भारताच्या जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये नीलम मिळतो. काश्मीरमध्ये आधी नागवंशीयांचे राज्य होते. नीलम शुद्ध रंगात मोराच्या मानेसारख्या रंगाचा असतो. असे म्हणतात की नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरात अस्सल नीलमणी ठेवलेला आहे. अर्थात या गोष्टीत किती तथ्य आहे की नीलमणी पासून खरच लाभ होतो, ही गोष्ट नक्की सांगता येत नाही.