खूनी नदी, रोहिणी
रोहिणीच्या कमी गर्दीच्या या भागात तशीही खूपच कमी लोकांची वर्दळ असते. नदीच्या आसपास कोणीही फिरकत नाही. कारण आहे, नदीच्या किनाऱ्यावर प्रेत मिळणे. हत्या, आत्महत्या, दुर्घटना, कारण काहीही असो, इथे नदीच्या किनाऱ्यावर प्रेते मिळणे नित्याचीच गोष्ट झाली आहे. हेच कारण आहे कि लोकांनी या ठिकाणाचा समावेश भयावह जागांमध्ये केला आहे.