फिरोज शाह कोटला किल्ला
१३५४ मध्ये फिरोज शाह कोटला याने बांधलेला हा किल्ला आज अक्षरशः एक खंडर बनला आहे. आजूबाजूच्या लोकांचा अनुभव आहे कि दर गुरुवारी इथे मेणबत्त्या आणि अगरबत्त्या जळताना दिसतात. एवढेच नाही तर, दुसऱ्या दिवशी किल्ल्याच्या काही भागांत एका भांड्यात दूध आणि कच्चे अन्न देखील ठेवलेले मिळते. असे नेहमी होत आलेले आहे, ज्या कारणाने हा किल्ला आता भूतांचा किल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.