Android app on Google Play

 

भूमिका

 

भारतीय पौराणिक कथांप्रमाणे इतर देशांमध्ये देखील काही पौराणिक कथा आणि समजुती आहेत. ज्याप्रकारे भारतात रती आणि कामदेव यांना प्रेमाच्या देवता मानले जाते आणि त्यांच्या बद्दल बोलले जाते की ते लोकांच्या मनात प्रेम आणि काम या भावना जागृत करतात, त्याचप्रमाणे युनान च्या पौराणिक कथा आणि समजुतींप्रमाणे काही अशा देवी देवतांचा उल्लेख केलेला आहे ज्यांचे प्रेम संबंध आणि नाते खूपच आगळे वेगळे आणि हैराण करणारे आहे. आता माहिती करून घेऊयात युनानच्या या सात देवी देवतांबद्दल ज्यांना युनान मध्ये खूपच रोमेंटिक मानले जाते आणि त्यांचे प्रेम संबंध लोकांना चकित करतात.