मँडी
मँडी ही १९१० ते १९२०मधल्या काळात इंग्लंड आणि जर्मनीच्यामध्ये बनवण्यात आलेली पांढऱ्या मातीपासून बनवण्यात आलेली चायनीज बाहुली, जी ब्रिटीश कोलंबियातील क्वेस्नेल संग्रहालयाला १९९१ मध्ये दान करण्यात आली. मँडीच्या दात्याने सांगितलं होतं की तिला तळघरातून मध्यरात्री रडण्याचे आवाज ऐकू यायचे आणि मँडीला दान केल्यापासून हे रडणं थांबलं होतं
जरी मँडीच्या दात्याकडचे रडण्याचे आवाज थांबले असले तरी मँडी ज्या संग्रहालयात होती तिथे विचित्र घटना घडू लागल्या. कर्मचाऱ्यांनी सांगितलं की जेवणं गायब होऊ लागली आणि इमारतीत दुसऱ्याच ठिकाणी सापडू लागली. आजूबाजूला कोणी नसताना पायऱ्यांवर पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले आणि कार्यालयातील पेन्सिल, पुस्तकांसारख्या वस्तू आधी ठेवलेल्या जागा सोडून दुसऱ्याच जागी दिसू लागल्या.
मँडीला कुठे ठेवावं हे ठरवण्यात संग्रहालयाचा काही वेळ मोडला. त्यांच्या सांगण्याप्रमाणे इतर बाहुल्यांना इजा पोचवण्याकडे तिचा कल असल्यामुळे तिला इतर बाहुल्यांसोबत ठेवता येत नव्हते. संग्रहालयाला भेट देणाऱ्यांच्या मते तिचे डोळे मिचकायचे किंवा तुम्ही जिथे जाल तिथे तुमचा पाठलाग करायचे. जेव्हा कोणी तिचे छायाचित्र घेण्याचा किंवा चित्रफीत काढण्याचा प्रयत्न करायचे त्यांच्या छायाचित्र काढण्याच्या यंत्रासोबत खेळ करणंही तिला आवडायचं.