एल्मो
१९९६ पासून एल्मो बाहुल्या जगभरातल्या मुलांच्या सुट्टीच्या खेळण्यांच्या यादीत सर्वात अव्वलस्थानी आहेत. या लहान मुलांसारख्या राक्षसापासून तोवर भीती नाही जोवर ती तुमचा खून करण्याची तुम्हाला भीती दाखवेल.
बोमॅन कुटुंबासोबत अशीच एक घटना घडली. २००८ साली दोन वर्षांच्या जेम्स बोमॅनकडे युअर नेम (एल्मोला तुमचं नाव माहीत आहे) ही बाहुली होती. ती बाहुली मालकाचे नाव लक्षात ठेवू शकेल आणि इतर काही वैयक्तिक वाक्यांकरिता बनवण्यात आली होती. या विशिष्ट बाहुलीला केवळ जेम्सचं नावच माहीत नव्हतं तर त्यात तिला “मारून टाक” हे शब्द जोडायला आवडायचे. एल्मो सतत “जेम्सला मारून टाका” गात रहायची, शेवटी काळजीने त्याच्या आईने त्या बाहुलीला जेम्सच्या नजरेआड ठेवण्याचे ठरवले.
त्या बाहुलीची बॅटरी बदलल्यानंतर तिने खुनाच्या धमक्या द्यायला सुरुवात केली. त्या बाहुलीचा निर्माता फिशर प्राइस याने बोमॅन कुटुंबियांना ती बाहुली बदलून घेण्याबाबत दाखला दिला होता. पण बोमॅन कुटुंबियांनी ती सवलत स्वीकारली की नाही याबद्दल काहीही माहिती नाही.