Get it on Google Play
Download on the App Store

दि डेविल्स बेबी बाहुली

https://s-media-cache-ak0.pinimg.com/736x/e8/df/41/e8df41414a00541bf691e9840c3bcb5c.jpg

न्यू ऑर्लिन्स शहराला मंत्रतंत्र आणि दंतकथा यांचा इतिहास आहे. आख्यायिकांत सांगितल्याप्रमाणे सन १८०० च्या सुमारास एका संपन्न कुटुंबातील एका मुलीने स्कॉटलंडमधील एका श्रीमंत मुलाशी लग्न केलं.

लॅव्यूने त्या नवरीला शाप दिला, असा शाप जो तिच्या पहिल्या बाळाच्या वेळी सफल झाली. एका विचित्र मुलाला जन्म देऊन ती तरुणच असलेली  आई वारली. असं म्हटलं जायचं की ती बाहुली सेटनची वंशज होती. लॅव्यूने त्या बाळाला घरी आणून मरेपर्यंत त्याची काळजी घेतली. अशी अफवा होती की ते बाळ वारल्यानंतर त्यालाही तिच्या शेजारी, सेंट ल्युईस स्मशान क्रमांक एक येथे पुरण्यात आले.     

न्यू ऑर्लिन्सचे नागरिक त्या राक्षसी बाळाला घाबरू लागले. लोक म्हणायचे की ते काळोखांत आणि अरुंद गल्लीबोळात लपायचं, जिथे जायचं तिथे नुकसान करायचं. स्वतःला वाचवण्यासाठी नागरिक खोट्या राक्षसी बाहुल्या त्यांच्या घराबाहेर टांगायचे जेणेकरून खरं राक्षसी बाळ ते पाहून घाबरेल. ह्यांतील काही बाहुल्या आजही अस्तित्वात आहे असं म्हटलं जात पण त्या अगदी दुर्मिळ आणि हव्याशा वाटणाऱ्या आहेत.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला याच राक्षसी बाहुल्यांचे नवीन रूप न्यू ऑर्लिन्सच्या आसपास दिसू लागले. त्या सगळ्या खऱ्या राक्षसी बाळासारख्या दिसत असल्यामुळे त्याही झपाटलेल्या आहेत असं म्हटलं जाऊ लागलं.

रिचर्डो पुस्तीआनो या कलाकारांनी असा दावा केला आहे की त्यांनी त्या शेवटच्या उरलेल्या बाहुलीचे अवशेष विकत घेतले आहेत आणि सध्या ते या बाहुल्या नव्याने बनवून विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहेत. बऱ्याच ग्राहकांनी या बाहुल्या सैतानी असल्याचा दावा केला आहे, ज्या त्यांच्या काचेच्या डोळ्यांनी तुमचा पाठलाग करतात आणि स्वतःच्या इच्छेनुसार फिरतात. या बाहुल्या ‘ग्राहकांनो सावधान’ अशा इशाऱ्यासह विकल्या जातात कारण ते राक्षसी बाळ अजूनही जिवंत आणि सुस्थितीत असल्याचं जाणवलं आहे.