Get it on Google Play
Download on the App Store

पॅटी रिडची बाहुली

https://s-media-cache-ak0.pinimg.com/236x/4f/6e/ea/4f6eea12c89e4a73eb4089752d04d868.jpg

एखाद्याला घाबरवण्यासाठी बाहुली शापित किंवा झपाटलेली असायला हवी असं नसतं. बऱ्याचदा बाहुलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव किंवा बरीच वर्ष इकडून तिकडे फिरत राहिल्याने एखादा नसलेला शरीराचा अवयवदेखील पुरेसे असतात. तर कधीतरी बाहुलीने नरमांसभक्षणाचे बरेच प्रसंग पाहिलेले असतात.

पॅटी रिडच्या बाहुलीसोबतही असंच काहीसं झालं होतं. आठ वर्षांची पॅटी तिचे कुटुंबीय आणि इतिहासात ‘डोनर पार्टी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समूहाच्या इतर जनकांसोबत १८४६ साली कॅलिफोर्नियाला जात होती. तुम्हाला सगळ्यांना आधीच माहिती असेल की, प्रवाशांच्या या समूहाला अतीव हिमवृष्टीमुळे पुढे प्रवास करणे अशक्य झाले आणि त्यांना मग चामडं, उंदीर, जुनी हाडं आणि शेवटी एकमेकांना खावं लागलं.

अर्ध्या प्रवासात पॅटीच्या घरच्यांनी गाडीचं वजन कमी करण्यासाठी तिला तिची खेळणी आणि अनावश्यक वस्तू टाकून द्यायला सांगितलं. तिनं सगळ्या गोष्टी एकत्र तर केल्या पण तिची आवडती बाहुली एका प्रचंड मोठ्या वस्त्राखाली लपवण्यात ती यशस्वी झाली. संपूर्ण रिड कुटुंबीय आणि ती बाहुली आश्चर्यकारक पद्धतीने त्या पश्चिमेकडील खडतर प्रवासातही जिवंत राहिली आणि पुढे मजेत सॅन जोसमध्ये आरामदायक आयुष्य जगू लागली. पॅटीची बाहुली सध्या कॅलिफोर्नियातील सॅक्रमेंटो येथे सटरच्या किल्ल्यातील ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात ठेवलेली आहे.

ही बाहुली झपाटलेली म्हणून ओळखली जात नसली तरी इतिहासात तिचे एक भयंकर स्थान आहे. तिच्याकडे पाहूनही माणसाचे मांस खाणाऱ्या लहान पॅटीचा विचार मनात न येणं ही खूप कठीण गोष्ट आहे. पॅटी आणि तिच्या बाहुलीचा अनुभव इतका लक्षवेधक आहे की १९५६ साली लहान मुलांच्या ऐतिहासिक काल्पनिक पुस्तकात ह्याबद्दल लिहिले गेले आहे आणि तेव्हापासून ते लहान मुलांना शिकवण्याचे काम करताहेत.