विष्णू
भगवान विष्णूला कमळ, मौलसिरी, जुई, कदम्ब, केवडा, चमेली, अशोक, मालती, वासंती, चाफा, वैजयंती यांची फुले विशेष प्रिय आहेत. त्यांना याची पिवळी फुले अधिकच पसंत आहेत. तुलसीपत्र वाहिल्याने भगवान विष्णू शीघ्र प्रसन्न होतात. कार्तिक महिन्यात केतकीच्या फुलांनी पूजा केल्याने भगवान विष्णू विशेष रूपाने प्रसन्न होतात. परंतु विष्णूवर आक, धोतरा, शिरीष, सहजन, सेमल, कचनार आणि गुलमोहर ही फुले कधीच वाहू नयेत. विष्णूला कधीही अक्षता अर्पण करू नयेत.