श्री गणेश
आचार भूषण ग्रंथानुसार भगवान श्री गणेशाला तुलसीपत्र सोडून बाकी सर्व प्रकारची फुले वाहिली तरी चालतात. पद्मपुराण आचाररत्न मध्ये देखील लिहिले आहे की ‘न तुलस्या गणाधिपम्’, अर्थात तुलसीपत्राने गणेशाची पूजा कधीही करू नका. केवळ गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला तुळशीपत्र वाहता येते. गणपतीला दुर्वा वाहण्याची प्रथा आहे. गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. दुर्वांच्या वरच्या भागाला तीन किंवा पाच पाने असतील तर फारच उत्तम.