शंकर
भगवान शंकराला धोतऱ्याची फुले, हरसिंगार, नागकेशराची पंढरी फुले, सुके कमळाचे गट्टे, कणेर, कुसुम, आक, कुश इत्यादींची फुले अर्पण करण्याची प्रथा आहे. भगवान शंकराला धोतऱ्याची फुले सर्वाधिक प्रिय आहेत. या व्यतिरिक्त त्यांना बेलपत्र आणि शमीची पाने वाहणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. भगवान शंकराला सेमल, कदम्ब, डाळिंब, शिरीष, माधवी, केवड़ा, मालती, जुई आणि कपाशीची फुले वाहिली जात नाहीत.