Get it on Google Play
Download on the App Store

परिचय

 

हिंदू धर्मात विभिन्न धार्मिक कर्म क्रियांमध्ये फुलांचे विशेष महत्त्व आहे. देवपूजा विधीमध्ये अनेक प्रकारची फुले आणि पाने देवाला वाहणे हे अत्यंत शुभ मानले गेले आहे. धार्मिक अनुष्ठान, पूजन, आरती इत्यादी क्रिया फुलांशिवाय अपूर्ण मानली जातात. तर काही विशिष्ट फुले देवांना वाहणे अशुभ मानले जाते. परंतु शास्त्रामध्ये अशी देखील फुले सांगितलेली आहेत, जी वाहिल्यामुळे प्रत्येक देवशक्तीची कृपा प्राप्त होते. ही फुले अतिशय शुभ, आणि देवतांना विशेष प्रिय असतात आणि प्रत्येक प्रकारच्या सुख - सौभाग्याची बरसात करतात. कोणत्या देवाची पूजा कोणत्या फुलांनी करावी, याच्या बाबतीत इथे संक्षिप्त स्वरुपात माहिती देण्यात आली आहे. ही फुले वाहिल्यामुळे आपली प्रत्येक मनोकामना लवकरच पूर्ण होते.

 http://www.hinduwebsite.com/hinduism/images/puja.jpg

आपल्या जीवनात फुलांचे खूप महत्व आहे. फूल ही ईश्वराची अशी निर्मिती आहे, जिच्या सुगंधामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात. त्यांचा सुगंध मनाला शांती देतो. खरे तर देव हा भावाचा, भक्तीचा भुकेला असतो, परंतु आपल्या देशात देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याच्यावर त्याच्या आवडीची फुले वाहण्याची श्रद्धा देखिल आहे. असे म्हटले जाते की देवाच्या आवडीच्या रंगला आधार मानून त्याला त्याच रंगाची फुले वाहिली जातात. लक्षात ठेवा, देवाची पूजा कधीही सुकलेल्या फुलांनी करू नका. कमळाच्या फुलाबद्दल अशी अशी श्रद्धा आहे की हे फूल दहा ते पंधरा दिवस देखील शिळे होत नाही. चाफ्याच्या कळी व्यतिरिक्त कोणत्याही फुलाची कळी कधीही देवाला अर्पण करू नये. कोणत्याही देवतेच्या पूजेत केवड्याची फुले वाहिली जात नाहीत.आता कोणत्या देवाला कोणती फुले प्रिय आहेत आणि कोणत्या देवाच्या पूजेत कोणती फुले विशेष करून वापरावीत याची थोडक्यात माहिती घेऊयात.